ल्युडो हा खेळ खेळताना माझ्या वडिलांनी मला फसवलं. माझा माझ्या वडिलांवर पूर्ण विश्वास होता ते ल्युडो खेळताना माझी फसवणूक करतील अशी अपेक्षा नव्हती असा आरोप करत एका २४ वर्षीय तरुणीने फॅमिली कोर्टात धाव घेतली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी ही घटना घडली आहे. फॅमिली कोर्टातील समुपदेशक सरीता यांनी ही माहिती एएनआयला दिली. या मुलीच्या समुपदेशनासाठी आम्ही चार सेशन्स आयोजित केली आहेत. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. माझे वडील मला ल्युडोमध्ये फसवतील असं मला मुळीच वाटलं नव्हतं. मात्र त्यांनी खेळ खेळताना मला फसवलं म्हणून कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे असं या मुलीने म्हटलं आहे. या मुलीला समुपदेशनाची गरज असून समुपदेशनासाठी आम्ही चार सेशन्स आयोजित केली आहेत असं कोर्टातल्या समुपदेशक सरिता यांनी ANI ला सांगितलं.

एप्रिल महिन्यात या सारखीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली होती. फरुखाबाद येथील महिलेने तिच्या पतीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. ल्युडो खेळतना पतीने आपल्याला फसवले असा आरोप तिने केला होता. त्यानंतर आता मध्यप्रदेशातली घटना समोर आली आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 24 year old woman approaches bhopal family court alleging cheating by her father in a ludo game scj
First published on: 26-09-2020 at 23:10 IST