अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त नबंर असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण असे अनेक वयस्कर लोक आहेत जे तरुणांना लाजवतील अशा पद्धतीने कामं करत असतात. सध्या अशाच एका वयस्कर आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तर नेटकऱ्यांनी आजीजवळ ६० व्या वर्षी २० व्या वर्षाची एनर्जी असल्याचं म्हटलं आहे. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.

@GaurangBhardwa1 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन आजीच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या १५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, आजीने भन्नाट डान्स केला आहे. जो नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पोस्टच्या कॅप्शनमध्ये, ‘२० वर्षांची शहरी मुलगी अंगदुखीची तक्रार करत आहेत आणि ही ६० वर्षांची ग्रामीण आजी.’ असं लिहिलं आहे.

हेही पाहा- मोबाईल पाहण्यात पोलीस व्यस्त; शेजारी बसलेल्या गुन्हेगारावर नाही लक्ष; IPS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो पाहून व्हाल थक्क

हेही पाहा- पिटबुलने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रायव्हेट पार्टचा घेतला चावा, संतप्त नागरिकांच्या मारहाणीत कुत्रा…

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वयस्कर आजी भिंगरी सारखी फिरताना दिसत आहे. तर या आजीचा डान्स पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या महिला आणि काही मुलं हसत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. शिवाय ते आजीला टाळ्या वाजवून डान्स करण्याठी प्रोत्साहनही देत आहेत. त्यामुळे ही आजी न थांबता दोन्ही हातांनी पाय धरून सलग नऊ वेळा जमीनीवर फिरल्याचं पाहायला मिळत आहे.

आजीच्या या डान्सचा व्हिडीओ आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एका व्यक्तीने आजी ६० पेक्षा जास्त वयाच्या वाटत असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.