रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांकडे दुर्लक्ष करतो. तुमचा आजचा दिवस सार्थकी लावेल असा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एक वाहतूक पोलिस कर्मचारी आणि गोंडस भडका कुत्रा यांच्यातील मैत्रीचा सुंदर क्षण दाखवला आहे. ब्लू क्रॉस ऑफ इंडियाने इंस्टाग्रामवर शेअर केलेली हा हृदयस्पर्शी व्हिडीओ एक आनंददायी क्षण दर्शवते. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमटेल.

व्हिडिओमध्ये व्यस्त वाहतूक पोलिस कर्मचारी एका रहदारी असलेल्या रस्त्यावर उभा आहे. नेहमीप्रमाणे तो रहदारीचे नियंत्रण करताना दिसत आहे. पण त्याच्याबरोबर एक भटका कुत्रा दिसत आहे जो वाहतूक कर्मचाऱ्याच्या अवती भोवती फिरतो आहे. आनंदाने उड्या मारतो आहे. इकडे तिकडे धावत आहे. काहीही करून वाहतूक पोलिसाचे लक्ष स्वत:कडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. वाहतूक पोलिस शांतपणे रहदारी नियंत्रित करण्याचे काम करत आहे. वाहतूक पोलिस ज्या दिशेला चालत जाईल त्या दिशेला कुत्रा जातो आहे. शेवटी तो वाहतूक पोलिसाचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतो पण वाहतूक पोलिस त्याच्याशी प्रेमाने संवाद साधताना दिसत आहे. व्हिडीओने नेटकऱ्यांनी मन जिंकले आहे. खेळकर कुत्रा आनंदीपणे खेळत आहे तर दयाळू वाहतूक पोलिस त्याच्याशी प्रेमाने वागतो आहे. वाहतूक पोलिस आणि भटक्या कुत्रा यांच्या मैत्रीचा सुंदर क्षण पाहून काही लोक भारावून गेले आहेत.

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. जवळपास ४ लाख लोकांनी व्हिडीओवर पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एकाने लिहिले, “बहुतेक पोलिस स्टेशनमध्ये भटके कुत्रे असतात ज्याची ते काळजी घेतात ते पोलिस स्टेशनचा एक भाग बनतात आणि प्रत्येकजण त्यांची काळजी घेतो.” “मला तरी हा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला.” असे दुसऱ्याने सांगितले. तिसरा म्हणाला,”हाच समाज तर आपल्याला हवा आहे”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ छोट्या आनंदाच्या क्षणाचे महत्त्व लक्षात आणून देते. रोजच्या धक्काधकीच्या तणाव पूर्वक आयुष्यात असा क्षण चेहऱ्यावर हास्य घेऊन येतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही नक्कीच हास्य येईल आणि तुमचा दिवस सार्थकी लागेल.