मांजर, कुत्रा, कावळा, पोपट अशा अनेक प्राण्यांचे अथवा पक्ष्यांचे व्हिडीओ तुम्ही नेहमी सोशल मीडियावर पाहता. यापैकी काही व्हिडीओ तुम्हाला थक्क करणारे असतात. प्राण्यांनाही भावना असतात हे दाखवणारे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. सध्या एका मांजर आणि कावळ्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तारेवर अडकलेल्या मांजरीची एका कावळ्याने कशा प्रकारे मदत केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे.
कावळ्याचे औदार्य
असे व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर दिसतात जे सिद्ध करतात की, “प्राणी देखील एकमेकांच्या भावना समजून समजून घेतात आणि एकमेकांना साथ देतात. माणसांप्रमाणेच त्यांनाही नातेसंबंध समजतात आणि ते कसे जपायचे हे त्यांना माहीत असते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ जो हे पुन्हा एकदा सिद्ध करत आहे. व्हिडिओमध्ये एक हुशार कावळा मांजरीला मदत करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एका मांजरीचे पिल्ली लोखंडी तारेच्या कुंपणांवर अडकलेले दिसत आहे. कुंपण ओलांडण्याच्या नादात मांजर कुंपनावरच अडकते. ना ती पुढे जाऊ शकते ना मागे. मांजर तारेशी झुंजताना पाहून एक कावळा तिच्या मदतीला येतो आणि अतिशय हुशारीने मांजरीला चोचीने पाठीमागून ढकलतो. मग, कावळ्याच्या मदतीने मांजर सीमा ओलांडते आणि खाली उडी मारते.
हेही वाचा – तुम्ही कधी दोन पायांवर चालणारे घुबड पाहिले का? नसेल तर ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहा
लोक म्हणे”कावळा हा सर्वात हुशार पक्षी”
हा व्हिडिओ ६ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे आणि लोक जोरदार कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “कावळा हा सर्वात हुशार पक्षी आहे.” दुसर्याने लिहिले, “पक्ष्यांना साधारणपणे मांजरीला चिडवायला आवडते.” तिसर्याने लिहिले, ठकावळ्याने केली दया.”