लग्नाआधी प्रत्येक मुलाला एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे त्याला दारू किंवा सिगारेटचं व्यसन आहे का? अनेक तरुण आपल्याला कसलही व्यसन नसल्याचं सांगतात. त्यानंतर मुलीचे पालक आपल्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात देतात. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हो कारण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका नवरदेवाला लग्नात त्याची सासूच सिगारेट पेटवून देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

कदाचित तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, यासाठी तुम्हाला व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल. या व्हिडीओमध्ये नवरदेव लग्न मंडपात बसलेला दिसत आहे. यावेळी वधूचे आई-वडिलही तिथे उपस्थित असल्याचं दिसत आहेत. याचवेळी मुलाची सासू असं काही कृत्य करते जे पाहून सगळेच आश्चर्यचकीत होतात. कारण सासू चक्क नवरदेवाच्या तोंडात सिगारेट टाकते आणि नंतर ती पेटवण्याचंही काम करते.

हेही पाहा- पांढरी साडी नेसून पाण्यावरुन चालणाऱ्या महिलेचा Video व्हायरल; लोकांनी ‘नर्मदा देवी’ समजून सुरु केली पूजा

मिळालेल्या माहितीनुसार, ही एक प्रथा आहे, जी दक्षिण गुजरातमधील काही गावांमध्ये पाळली जाते. पण या विचित्र विधीबद्दल जाणून घेतल्यावरही अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे, “बायको कसलीही मिळुदे पण सासू मात्र अशीच असावी. टीप: धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे.”

हेही पाहा- कर्नाटकातील फोटोनंतर पंतप्रधान मोदींचा तामिळनाडू दौऱ्यातील ‘तो’ Video प्रचंड व्हायरल; नेटकरी म्हणाले “प्राणीप्रेम…”

हा व्हिडिओ @joohiie नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, लग्नातील एक नवीन परंपरा पाहिली, ज्यामध्ये सासू आपल्या जावयाचे स्वागत मिठाईसोबत सिगारेट आणि पान देऊन करते. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, या पोस्टसोबत एक सूचना देण्यात आली आहे, ज्यामध्ये सांगितले आहे, “ही जुनी परंपरा आहे, जी दक्षिण गुजरातच्या काही गावांमध्ये पाळली जाते. पण या ठिकाणी कवेळ सिगारेट पेटवली जाते, पण ती ओढली जात नाही. व्हिडीओतही केवळ विधीपुरती सिगारेट पेटवली होती.”