Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लग्नातील तर कधी कोणत्या कार्यक्रमाचे हे भन्नाट डान्स व्हिडीओ असतात. तुम्ही अनेक कपल डान्स पाहिले असेल पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा कपल डान्स पाहून तुम्हालाही पोट धरुन हसायला येईल. या व्हिडीओत एक व्यक्ती आपल्या बायकोबरोबर तुफान डान्स करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या कार्यक्रमाचा निर्माता क्रांती माळेगावकर मधूर आवाजात स्टेजवर गीत गात आहे तर त्या गीतावर अनेक कपल डान्स करत आहे. त्यातील एक व्यक्ती बायकोला बाजूला उभे करुन एकटाच तुफान डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर थोड्या वेळाने हाच व्यक्ती बायकोला कडेवर उचलून डान्स करताना दिसतो. हा डान्स व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : भरलग्नात नवरीने नवरदेवाच्या डोक्यावर केला पापडाचा चुरा; कारण ऐकूण व्हाल थक्क

क्रांती माळेगावकर यांनी krantimalegaokar या त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुफान डान्स” आणि या व्हिडीओवरही एक कॅप्शन लिहिले आहे, “हिरो जोमात बाकी कोमात” या व्हिडीओवर कमेंट्सचे ऑप्शन दिसत नाही.