सोशल मीडियावर प्राण्यांमधील लढाईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहून आपण आपले हसू आवरू शकत नाही, मात्र काही व्हिडीओ इतके भयंकर असतात की ते पाहिल्यानंतर आपल्याही छातीत धडकी भरू शकते. काही जंगली प्राण्यांच्या लढाईचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. मात्र, सध्या दोन बैलांमधील झुंज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या झुंजीमुळे बैलांचेच नाही तर बाजूच्या घरचेही नुकसान झाल्याचे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका रहिवासी परिसरातच दोन बैल आपापसात भिडले. यावेळी दोघांपैकी एकही बैल मागे हटण्यास तयार नव्हता. मात्र यानंतर जे झालं ते अतिशय भयानक आहे. बैलांमध्ये सुरु असलेल्या या झुंजीने काहीच सेकंदामध्ये अतिशय रौद्र रूप धारण केले. त्याचा पारिणाम इतका तीव्र होता की शेजारच्या घराचेही यामध्ये नुकसान झाले.

१८ फुटाच्या अजगराने एका दमात गिळली ५ फुटाची मगर; नंतर अशी हालत झाली की…; Viral Video पाहून उडेल थरकाप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओमध्ये दिसणारे हे बैल एकमेकांना शिंगांनी धक्का देत होते. काहीवेळातच उजवीकडील बैलाने समोरच्या बैलाला ढकलत ढकलत एका घराजवळ नेले. त्यानंतर त्याने त्याला जोरात धक्का दिला. यामुळे तो बैल तेथील मंडपावर आदळला आणि खाली पडला. यानंतर हा मंडपही कोसळला. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठे शूट करण्यात आला आहे हे अद्याप समजलेले नाही. इन्स्टाग्रामवर अ‍ॅनिमल पॉवर या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.