Viral Video : छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे आराध्यदैवत आहे. प्रत्येक मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतात. त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. गड किल्यांना भेट देऊन महाराजांना आदरांजली वाहतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे लाखो चाहते आहे जे महाराजांविषयी नेहमी प्रेम व्यक्त करतात. सोशल मीडियावर महाराजांचे व्हिडीओ शेअर करतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

छत्रपती शिवाजी महाराज हे ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखले जातात. ते रयतेची नेहमी काळजी घ्यायचे. त्यांनी रयतेला नेहमी सांभाळले. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला शिवाजी महाराजांच्या शिकवणीची आठवण येईल. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा भगव्या झेंड्याच्या सावलीत निवांत झोपलेला दिसत आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

हेही वाचा : Video : तरुणांनो, 75 वर्षांची आजी रोज घाम फुटेपर्यंत चालते; पाहा, आज्जीचा प्रेरणादायी व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक अपार्टमेंट दिसेल. या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या बालकनीत एक भगवा झेंडा दिसेल. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महारांजांची प्रतिमा साकारलेली आहे. सगळीकडे ऊन दिसत आहे. या उन्हात या झेंड्याची सावली अपार्टमेंटच्या खाली पडलेली दिसत आहे. विशेष म्हणजे उन्हापासून स्वत:ला वाचवण्यासाठी एक कुत्रा या झेंड्याच्या सावलीत झोपलेला दिसत आहे. श्रीपति भूपति हा अमचा राजा हे सुंदर गीत या व्हिडीओवर लावलेले आहे. व्हिडीओ पाहून तु्म्हीही अवाक् व्हाल. हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्र नेहमी आपल्या डोक्यावर असते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “छत्र ; आजही महाराजांचे छत्र आम्हावर आहे..” बारा हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून या व्हिडीओवर असंख्य लाईक्स दिसत आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.