मकर संक्रांत हा सण आंध्र प्रदेशातील एक प्रमुख सणांपैकी एक आहे. तिथे हा सण मोठ्या थाटामाटत साजरा करण्यात येतो. मात्र, यावेळी आंध्र प्रदेशातील एका कुटुंबाने संक्रांतीच्या दिवशी अशी गोष्ट केली हे कुटुंब एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे. सध्या हे कुटुंब सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. खरतरं या कुटुंबाने आपल्या होणाऱ्या जावयासाठी संक्रांतीनिमित्त भव्य मेजवानीचे आयोजन केले होते.

आंध्र प्रदेशमधील नरसापुरम येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने संक्रांतीच्या दिवशी त्यांच्या होणाऱ्या जावयासाठी भव्य मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीत फक्त १०, २०, ३०, नाही तर चक्क ३६५ प्रकारचे पदार्थ बनवले होते. तेलुगू संस्कृतीत संक्रांतीच्या दिवशी जावयाला आमंत्रण देण्याची प्रथा आहे. या कुटुंबानेही तेच केले आणि ३६५ प्रकारचे पदार्थ आपल्या होणाऱ्या जावयाच्या स्वागतात बनवले.

कोणते पदार्थ होते?

आता तुम्ही विचार करत असाल की ३६५ प्रकारचे पदार्थ होते, तर त्यात काय असेल? तेव्हा या कुटुंबाने त्यांच्या जावयासाठी ३० प्रकारच्या कढी, भात, बिर्णायी आणि पुलिहोरा बनवले, १०० प्रकारच्या मिठाई बनवल्या, १५ प्रकारचे आईस्क्रीम, पेस्ट्री, केक आणि गरम आणि थंड पेय बनवले आणि या व्यतिरिक्त अनेक प्रकारची फळं होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
andhra pradesh gave grand feast to son-in-law, 365 types of dishes for son-in-law,
आंध्र प्रदेशातील एका कुटुंबाने आपल्या जावयासाठी खास मकर संक्रांतीच्या दिवशी तब्बल ३६५ पदार्थ बनवून अनोख आदरातिथ्य केलं आहे.

नक्की काय झालं?

दरम्यान, या मुलीचे वडील सोन्याचे व्यापारी आहेत. कृष्णा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या टी सुब्रह्मण्यम आणि अन्नपूर्णा यांनी त्यांचा मुलगा साईकृष्णाचे लग्न सोन्याचे व्यापारी असलेल्या अत्यम व्यंकटेश्वर राव यांची मुलीगी कुंडवीशी करण्याचे ठरवले. मुलीचे आजी-आजोबा यांची इच्छा होती ती यावेळी सणाला नातीच्या होणाऱ्या नवऱ्याचे भव्य स्वागत झाले पाहिजे, म्हणून त्यांनी ३६५ प्रकारचे पदार्थ ठेवले होते.