Video Viral : बाप हा बाप असतो. आईचे गोडवे आपण अनेकदा ऐकतो पण वडिलांविषयी फारसे बोलले जात नाही. वडिलांची माया ही जगावेगळी असते. परिस्थिती कशीही असो मुलांसाठी झटतो तो बाप असतो. वडिल मुलांच्या नात्यातील गोडवा जपणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक असाच व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुलींना सायकलवर घेऊन जाताना वडिल दिसत आहे. व्हिडीओ पाहून कदाचित तुम्हालाही तुमच्या वडिलांची आठवण येऊ शकते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन मुली एकाच सायकलवर बसल्या आहेत. एका मुली्च्या हातात नवीन वस्तू दिसत आहे. कदाचित त्यांनी या वस्तू खरेदी केल्या असाव्यात. वडिल सुरुवातीला सायकल हातात धरुन मुलींना सायकलवर बसवून नेताना दिसतात. त्यानंतर ते सुद्धा सायकलवर बसून दोन्ही मुलींना नेताना दिसतात. सायकल ही फक्त डबल सीट असते. चालणाऱ्याशिवाय फक्त एकच व्यक्ती सायकलवर बसू शकतो पण या या व्हिडीओत वडिल दोन्ही मुलींना एकाच सायकलवर बसवून नेताना दिसत आहे. वडिलांचा हा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांतून पाणी येऊ शकते.

हेही वाचा : Prostate Cancer : पुरुषांना होणारा प्रोस्टेट कर्करोग कसा ओळखावा? जाणून घ्या, काय आहेत लक्षणे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” वडिलांचे ऋण मुलं कधीच फेडू शकत नाही.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “खूप छान व्हिडीओ” तर एका युजरने लिहिलेय, “अतिशय भावनिक व्हिडीओ” काही युजर्सनी व्हिडीओ पाहून त्यांच्या वडिलांची आठवण आली आहे.