Viral Video : भारत देशाची परंपरा आणि संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. कारण भारतीय परंपरेनुसार विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, तर परदेशातील रहिवासीसुद्धा भारताच्या अनेक पद्धतींचा रोजच्या जीवनात उपयोग करताना दिसून येतात. आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे.ज्यात एक परदेशी तरुण बिहारी पद्धतीत वरण-भात आणि बटाट्याची भाजी बनवताना दिसून आला आहे.

वरण-भात आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला ब्लॉगर बटाट्याचे लहान तुकडे करतो आणि ते मोहरीच्या तेलात तळून घेतो आणि देसी मसाले त्याच्यात घालतो. शिवाय डाळीत फोडणी देण्यासाठी त्याने मिरची, जिरे, कांदा, हिंग आणि लसूण हलकेच भाजले आणि डाळीला तडका दिला आहे. अशा प्रकारे परदेशी तरुण वरण-भात आणि बटाट्याची भाजी तयार करून घेतो. परदेशी तरुणाने कशा प्रकारे दाल- तडका आणि बटाट्याची भाजी बनवली, हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाचं…

हेही वाचा… जिद्दीला सलाम! दिवसभर फार्मा कंपनीमध्ये करते जॉब, ऑफिस सुटताच विकते पास्ता, ‘या’ तरुणीची प्रेरणादायी कथा एकदा वाचा

व्हिडीओ नक्की बघा :

बिहारी पद्धतीत तयार केलं जेवण :

सोशल मीडियावर बऱ्याचदा पदार्थांचे व्हिडीओ भन्नाट व्हायरल होत असतात. काही फॅक्टरीमधले असतात, तर काही रस्त्यांच्या स्टॉलवरील असतात; तर आता या यादीत हा व्हिडीओसुद्धा जोडला गेला आहे. व्हिडीओत परदेशी तरुण देसी पद्धतीत जेवण बनवताना दिसून आला. परदेशी तरुण बिहारी स्टाईलमध्ये जेवण बनवून एका बाजूला कांदा, मिरची तर दुसऱ्या बाजूला वरण आणि ताटाच्या अगदी मधोमध भात वाढून त्यावर बटाट्याची भाजी वाढून घेतो आणि मग जेवायला सुरुवात करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @plantfuture या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेक ड्रायन’ असे या ब्लॉगरचे नाव आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून परदेशी तरुणाचे कौतुक करत आहेत. तसेच पुढचा पदार्थ ‘लिट्टी चोखा’ बनव असे आवर्जून सांगताना दिसून आले आहेत. तसेच अनेक जण दाल-तडका हे आमचं प्रेम आहे, असेसुद्धा कमेंटमध्ये सांगताना दिसून येत आहेत.