लहान असताना तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर अनेक खेळ खेळला असणार. परीक्षेनंतर शाळेला सुट्टी मिळाली की, लगोरी, कॅरम, व्यापार, लपाछपी आदी अनेक खेळ आपण सगळ्यांनीच खेळले असतील. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, इथे लहान मुलांमध्ये नाही, तर एक मांजर आणि तिची मालकीण यांच्यात लपंडावाचा खेळ सुरू आहे; जो खेळ पाहून तुमचंही मन तो नक्कीच जिंकून घेईल.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिला आणि मांजर यांच्यामध्ये एक अनोखा खेळ रंगला आहे. चटईखाली मांजर लपलेली असते आणि महिला कोण आहे खाली? असे विचारते आणि मांजरीच्या अंगावरची चटई बाजूला काढते तेव्हा मांजर महिलेला पाहून मजेशीर हावभाव देते आणि पुन्हा चटईच्या आतमध्ये पळून जाते. अशा प्रकारे मांजर आणि महिला यांच्यामध्ये अनोखा लपंडावाचा डाव रंगला आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…बापरे! कुत्र्याने चक्क पेटलेले अनार तोंडात धरले, पुढे काय झाले? व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, महिला मांजरीला चटईखालून काढण्याचा प्रयत्न करीत असते. पण, मांजरीला मस्ती करायची असते. तुला लपाछपी खेळायची आहे का, असे महिला मांजरीला हिंदी भाषेत विचारते. हे ऐकताच मांजर चटईच्या आतमध्ये पुन्हा लपून बसते, तर एकदा बाहेर येते, ती मांजर चटईखाली आणि चटईबाहेर, अशा प्रकारे सतत ये-जा करताना दिसते आहे. एकंदरीतच महिला आणि मांजरीचा अनोखा लपंडावाचा डाव रंगला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @straycatslover या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेक जण मजेशीर कमेंट्स करीत आहेत. तसेच काही जण त्यांच्या पाळीव मांजरींबरोबरचे मजेशीर क्षण कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत. एकंदरीतच या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.