Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने माती आणि शेण वाहून नेण्यासाठी चक्क बोलेरो गाडीचा वापर केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. खरं तर माती किंवा शेण वाहून नेण्यासाठी लोक लहान मोठ्या ट्रकचा वापर करतात पण या व्हिडीओमध्ये चक्क बोलेरो गाडीने माती आणि शेण वाहून नेत आहे.

व्हिडीओमध्ये एक कामगार बोलेरोमध्ये शेण भरताना दिसत आहे. बोलेरोची ही भयानक स्थिती पाहून कोणीही अवाक् होईल. हा व्हिडीओ राजस्थानचा असल्याचे सांगितले जात आहे.सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बोलेरोची केली भयानक अवस्था, भरले शेण अन् माती

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बोलेरो ही गाडी पूर्णपणे शेणाने आणि मातीने भरलेली आहे. फक्त ड्रायव्हरच्या बाजूची सीट रिकामी आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक कामगार लोखंडी टबमध्ये माती शेण भरून बोलेरो गाडीमध्ये टाकत आहे. बोलेरोमध्ये माती आणि शेण भरत असल्यामुळे कोणीही अचंबित होईल. प्रत्येकाला त्याची गाडी प्रिय असते. गाडीला थोडा स्क्रॅच पडला तरी जीव कासावीस होतो पण या व्हिडीओमध्ये संपूर्ण बोलेरो गाडी शेण आणि मातीमुळे घाण झाली आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल तर बोलेरो सारख्या गाडीमध्ये शेण आणि माती का वाहून नेत आहे, असा प्रश्न सुद्धा काही लोकांना पडू शकतो.

हेही वाचा : Video : “देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा येईन…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Pune Video : धक्कादायक! गुडघाभर पाण्यात कारमध्ये अडकली होती महिला, पोलिसांच्या मदतीने…; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

reenamawai001 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा शेतकरी आहे. हा काहीही करू शकतो” तर एका युजरने लिहिलेय, “मला एवढं श्रीमंत व्हायचं आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “असा शेतकरी पाहिजे. ट्रॅक्टर मध्ये तर कोणी पण शेणखत भरेल.” या व्हिडीओवर अनेक युजर्स शेतकऱ्याच्या हितार्थ बोलले आहेत.