Shocking video : सोशल मीडियावर नेहमी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. लहान मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडंसंही दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चे कंपनी खेळता खेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मूल असल्यास ही बातमी आवर्जून वाचणं गरजेचं आहे. कारण- हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सध्या समोर आली आहे. यावेळी खेळता खेळता थेट गॅलरीवर चढलं आणि पुढे काय झालं तुम्हीच पाहा. हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लहान मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही श्वास रोखून धराल..
तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कधी कधी पालकांचाही हलगर्जीपणा कारणीभूत ठरतो. असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही सेकंदांसाठी तुमच्याही काळजात धस्स होईल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाळ घराबाहेरील बाल्कनीत खेळत आहे आणि खेळता खेळता अचानक हे बाळ बाल्कनीच्या लोखंडी सेफ्टी ग्रीलवर चढू लागतं. अवघ्या काहीच सेकंदात हे बाळ वर चढू लागत आणि तेवढ्यात त्याला मागून येऊन कोणीतरी पकडतं. यावेळी थोडाचा उशीर आणि हे बाळ अक्षरश: खाली पडलं असतं.
पाहा व्हिडीओ
एकीकडे धकाधकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. अशातच अशा प्रकारच्या अनुचित घटनांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर rsd_academy02 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.