आपल्या देशात अशी कोणतीही समस्या नसेल ज्यासाठी लोकांनी कोणता ना कोणता जुगाड केला नसेल. या जुगाडमुळे अनेक समस्यांवर अगदी काही वेळात समाधान शोधले जाते. कित्येकदा तर महागड्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी लोकं देसी जुगाडचा वापर करतात. सोशल मीडियावर देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर या व्यक्तीने रस्ता ओलांडण्यासाठी जी शक्कल लढवली आहे, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

भारतामध्ये वाहनांचे प्रमाण खूपच वाढले आहे. रस्त्यावर गाड्यांच्या रांगच रांगा आपण पाहू शकतो. यामुळे प्रदूषण समस्या तर वाढत आहेच, पण सोबतच ट्राफिक जॅम आणि रस्त्यावर गर्दीही मोठ्या प्रमाणावर होते. वाहनचालकांसोबतच रस्त्यावर चालणारे लोकही या समस्येमुळे त्रस्त आहेतच. मात्र, एका पठ्ठ्याने वाहनांच्या गर्दीतून वाट काढण्यासाठी एक शक्कल लढवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शोएब अख्तर रुग्णालयात दाखल; सोशल मीडियावर भावुक Video शेअर करत म्हणाला, “ही माझी शेवटची….”

ट्रोल चार्जर या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आपलं हसू आवरता येत नाही आहे. कमेंट सेक्शन हसणाऱ्या ईमोजींनी भरून गेला आहे. या माणसाने नेमकं असं काय केलं आहे हे पाहूया.

या व्हिडीओमध्ये आपण एक माणूस पाहू शकतो. त्याच्याबरोबर त्याची स्कुटी आहे. या माणसाला रास्ता ओलांडायचा आहे, पण या रस्त्यावर एक ट्रक थांबलेला असल्यामुळे त्याला रास्ता ओलांडता येत नाही आहे. रस्त्यावर बरीच गर्दीही जमली आहे. म्हणून रस्ता पार करण्यासाठी हा माणूस आपली स्कुटी घेऊन ट्रकच्या खाली घुसला आणि त्याने रास्ता पार केला.

Black Tiger Viral Video : ओडिसामधील काळ्या वाघाची सोशल मीडियावर चर्चा; निसर्गाचा चमत्कार पाहून नेटकरीही झाले चकित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही आहे. एखाद्या परिस्थितीतून लोक कशाप्रकारे मार्ग काढतील हे सांगता येत नाही. पण देशी जुगाड करण्यात लोक खरंच खूप तरबेज आहेत एवढं नक्की.