Viral Video : असं म्हणतात, मनात जिद्द असेल तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही हात नसलेला तरुण थेट बाइक चालवताना दिसतोय. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? हाताचा न वापर करता बाइक कशी चालवता येते? पण या तरुणाने हे करून दाखवले आहे. या तरुणाने अनोखा जुगाड केला आहे. या जुगाडच्या मदतीने तो बाइक चालवताना दिसेल.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ प्रेरणादायी असतात. असाच हा प्रेरणादायी व्हिडीओ पाहून तु्म्हाला वाटेल की जगात अशक्य काहीच नाही.

जगात अशक्य काहीच नाही..

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन्ही हात नसलेला तरुण बाइकवर बसतो आणि बाइकच्या हँडलवर जाड तार गुंडाळतो आणि त्याच्या हाताचे कोपस फसेल असे दोन्ही बाजून हँडल तयार करतो. पुढे या हँडलमध्ये हा तरुण त्याचे दोन्ही कोपर फसवतो. त्यानंतर तो डबलसीट नाही तर ट्रिपल सीट आणखी दोघांना बाइकवर घेऊन जातो. हात नसलेल्या तरुणाला ट्रिपल सीट बाइक चालवताना पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काही लोकांना विश्वास बसणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की या जगात अशक्य काहीच नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
E Rickshaw Viral Video
बाईकपासून सायकलपर्यंत रस्त्यात सर्वांना ठोकत गेली ई-रिक्षा अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल; पाहा व्हिडीओ
dance video
आयुष्य एकदाच मिळतं, फक्त मनभरून जगता आलं पाहिजे! वयाच्या नव्वदीत आजीने केला भन्नाट डान्स, ऊर्जा पाहून व्हाल थक्क
a groom pick up ghoonghant of bride
VIDEO : नवरीच्या चेहऱ्यावरील घूंघट उचलताच नवरदेव गेला कोमात, नेमकं काय पाहिलं ? व्हिडीओ होतोय व्हायरल
cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
Puneri Patya Video
Puneri Patya : “… अन्यथा मत मिळणार नाही” पुणेरी पाट्यांचा विषय जगात भारी, पाहा व्हायरल VIDEO
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
a young man was saved due to wearing helmet
VIDEO : हेल्मेट घातले म्हणून वाचला; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: काशिनाथाचं चांगभलं…बावधनचा “बगाड्या” ठरला; बगाड ओढण्यासाठी बारा बैलांची जोडी सज्ज, यात्रेची लगबग सुरु

bapu_zamidar_short या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “याला म्हणतात खरा देशी जुगाड” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा अप्रतिम” तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेक लोकांना तरुणाचा हा अनोखा जुगाड आवडला आहे तर काही युजर्सनी तरुणाच्या हिंमतीचे कौतुक केले आहेत.