Bavdhan Bagad Yatra 2024: सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्त्वाचं गाव. सोमजाईचा आणि वैराटगडाच्या डोंगर खोऱ्यात हे गाव “बावधन” पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध अशी बावधन यात्रा ‘काशीनाथाचं चांगभलं’च्या गजरात यंदा ३० तारखेला होणार आहे. साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेली बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये भरते. बावधन गावची बगाड यात्रा ही दरवर्षी फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी भरवली जाते. मात्र, याची तयारी ही जवळ जवळ एक ते दीड महिना अगोदरपासून केली जाते. दरम्यान काल होळी पोर्णिमेच्या रात्री यंदाचा बगाडी ठरवण्यात आला आहे.

बावधन बगाड २०२४ चा यात्रेचा “बगाड्या” होण्याचा मान श्री. विकास तानाजी नवले यांना मिळाला आहे. हे शेलारवाजी बावधनचे राहणारे आहेत. बहिणीला अपत्य प्राप्ती साठी त्यांचे मोठे बंधू वैभव नवले यांनी नाथांना नवस केला होता. तो पूर्णत्वास गेला भावाने केलेल्या नवसाची पूर्ती करण्यासाठी श्री विकास कौलासाठी बसले होते आणि त्यांना महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बावधन बगाड यात्रेसाठी मानाचा बगाड्या होण्याची संधी मिळाली आहे. शनिवार ३० मार्च २०२४ रोजी बगाड यात्रा संपन्न होईल.

Nanded, married couple suicide,
नांदेड : नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, कंधार तालुक्यातील कळकावाडीतील घटना
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Wild dogs were found for the first time in Phansad Sanctuary
फणसाड अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानकुत्र्यांचा वावर
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक

“बगाडी” श्री. विकास तानाजी नवले

हेही वाचा >> ‘अगं बाई अरेच्चा’मध्ये दाखवलेली साताऱ्यातील सर्वात मोठी ‘बगाड यात्रा’ खरी कशी साजरी होते? कसा ठरवतात “बगाडी”?

बगाडी कसा ठरवला जातो?

साताऱ्यातील बावधन गावातील यात्रा म्हणजेच सुप्रसिद्ध बावधनची यात्रा बऱ्याच वर्षांपासून कुतूहलाचा विषय ठरत आहे. मात्र, या यात्रेदरम्यान सर्वात मुख्य आकर्षणाचा विषय असतो ते म्हणजे ‘बगाडी’.. या यात्रेदरम्यान दरवर्षी एका व्यक्तीला हा बगाडी होण्याचा मान मिळतो. मात्र, बऱ्याच जणांना असा प्रश्न अजूनही आहे की, हा बगाडी नेमका कसा निवडला जातो? बावधनचा हा बगाडी होळी पौर्णिमेला रात्री १२ वाजता ठरवला जातो. ग्रामस्थ आणि बावधन बगाड यात्रा समिती एकत्र येऊन कौल काढतात आणि बगाड्याचं नाव घोषित करतात. काल रविवारी हा कौल काढण्यात आला. यावेळी डाव्या बाजूला पाच कौल आणि उजव्या बाजूला पाच कौल असतात. म्हणजेच उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला गहू असतात. प्रत्येक नवसपूर्ती व्यक्तींच्या नावाने गहू गाभाऱ्यामध्ये लावले जातात. उजव्या बाजूचा जो गहू पडेल तो बगड्या म्हणून निवडला जातो. म्हणजे उजवा कौल ज्याच्या नावाने लागेल त्याच्यावर बगाड येते. यानंतर सर्वांच्या संमतीनं पंच बगाड्याचं नाव घोषित करतात. यासंदर्भात बावधान बगाड गावचे समिती अध्यक्ष रामचंद्र पिसाळ यांनी माहिती दिली आहे.