Kili Paul Viral Video: सोशल मीडिया स्टार किली पॉल हे सध्या इंटरनेटवरील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. पॉल अनेकदा बॉलिवूड गाण्यांचे लिप्सिंग करताना किंवा डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहते देखील किली पॉल याच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरून प्रेम देतात. दरम्यान आता किली पॉलदेखील मराठी गाण्यांच्या प्रेमात पडला आहे. या रिल्समधील किलीच्या मराठमोळ्या अंदाजाचं अनेकजण कौतुक करत आहेत. सध्या महाराष्ट्रात गाजत असलेलं “गुलाबी साडी अन् लाली लाल लाल” यावर किली पॉलने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहेत.
सद्या सोशल मीडियावर गुलाबी साडी अन् लाली लाल लाल हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजवर या गाण्यावर लाखो युजर्संनी व्हिडिओ आणि रिल्स शुट केला आहे. इन्स्टाग्रामवरचा हा ड्रेन्ड काही संपेना. या गाण्यावर किली पॉल यांने देखील एक रिल इन्टाग्रामवर शेअर केला आहे. किली पॉलने त्याच्या किलर एक्स्प्रेशनसह हा रिल शेअर केला आहे. ही रिल त्याने वितानतळावर शुट केले आहे. संजू राठोडचे हे गाणं मोठ्या प्रमाणात प्रसिध्द होत आहे. गुलाबी साडीच्या गाण्याने अनेक चाहत्यांना भुरळ पाडली आहे. यातच किली पॉलही या गाण्यावर रील बनवण्यासाठी स्वत:ला रोखू शकला नाही. किलीचं मराठी ऐकून नेटकरी थक्क झाले असून त्याचं कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> उत्तराखंडच्या घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य पाहून घाम फुटेल, नक्की चूक कुणाची?
सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्या गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं त्यानंतर ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं आता ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला मिळाला आहे.
दरम्यान, याआधी किली पॉलने अनेक मराठी गाण्यावर रील्स केली होती. ‘चोरु चोरून’, ‘मधुमास’ या मराठी गाण्यांवर किलीने बहीणबरोबर रील केली होती. याशिवाय त्याचं ‘गाव सुटना’ या गाण्यावरील रील तुफान व्हायरल झाली होती.