Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ इतके विचित्र असतात की पाहून तर पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला क्षणभरासाठी काहीही कळणार नाही की नेमकं काय चाललंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की भर रस्त्यावर दुचाकीस्वाराच्या मदतीला एक तरुण धावून आला आणि त्याने जे काही केले ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कदाचित हसू आवरणार नाही. तुम्हाला वाटेल असं या तरुणाने काय केलं किंवा दुचाकीस्वाराची कोणती मदत केली? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.

अनेक जण संधी मिळेल तशी इतरांना मदत करत असतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला एक तरुण दुचारीस्वाराची मदत करताना दिसेल. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एक दुचाकी चालक सिग्नलवर थांबलेला आहे. अचानक त्याच्या पाठीला खाज सुटते त्यामुळे तो हाताने पाठ खाजवायला लागतो पण तितक्यात मागून एक तरुण येतो आणि त्याला मदत करतो. त्याची पाठ खाजवून देतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. भर रस्त्यावर दुचाकीस्वाराला अशी पाठ खाजवून देणारी व्यक्ती तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल. अशावेळी आपल्या देशात काहीही घडू शकते, असे तुम्हाला वाटेल. विशेष म्हणजे दुचाकी चालक सुद्धा त्याला पाठ खाजवू देतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दुचाकीस्वाराच्या मागे उभी असलेल्या कारमधील एका व्यक्तीने शूट केला आहे.

हेही वाचा : Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्रभू श्रीरामासाठी बनवलाय ११०० किलोचा दिवा, पाहा व्हायरल फोटो

Juger या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जगात अजूनही माणूसकी शिल्लक आहे. व्हायरल मजेशीर व्हिडीओ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी मदतीला धावून आलेल्या तरुणाचे कौतुक केले आहेत.