Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फोटोशूट करणे या जोडप्याला चांगलेच महागात पडले.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक महिला फोटोशूटसाठी समुद्रकिनारी असणाऱ्या पायऱ्यांजवळ उभी असते; पण अचानक तिचा पाय घसरतो आणि ती पडते. बायकोला पडताना बघून नवरा तिला वाचवायला धावत जातो, तेव्हा पायऱ्यांवरून त्याचाही पाय घसरतो. एकंदरीत फोटोशूट करणे नवरा-बायकोच्या अंगलट आले. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : OMG! आता माकडही झालेय पाणीपुरीचे फॅन; पाणीपुरी खातानाचा माकडाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

kookslams या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्सना धक्का बसला आहे. अनेक युजर्सनी ही गंभीर घटना असल्याचे म्हटले आहे; तर काही युजर्सनी, हे कपल आता ठीक आहे का, अशी विचारपूस केली आहे.
सेल्फी फोटोशूटच्या नादात अशा अनेक घटना घडतात. सोशल मीडियावर यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी सेल्फी घेताना किंवा फोटोशूट करताना स्वत:ची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे.