scorecardresearch

लोकल ट्रेनच्या सीटवर आढळला वापरलेला कंडोम, फोटो Viral होताच प्रवाशांनी व्यक्त केला संताप

मुंबईतील एका लोकलमध्ये वापरलेला कंडोम सापडल्याचा अत्यंत किळसवाण आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे

लोकल ट्रेनच्या सीटवर आढळला वापरलेला कंडोम, फोटो Viral होताच प्रवाशांनी व्यक्त केला संताप
सध्या सोशल मीडियावर अनेक विचित्र घटनांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. (Photo : Twitter)

सध्या सोशल मीडियावर अनेक विचित्र घटनांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये काही लोकांनी सार्वजनिक ठिकाणी वागण्याच्या मर्यादा ओलांडल्याचं दिसून येत आहे. कारण नुकतेच काही दिवसांपुर्वी एका जोडप्याने भर रस्त्यात बाईकवर एकमेकांना मिठी मारून किस करतानाची घटना समोर आली होती, तर आणखी एका जोडप्याने असंच कारचे सनरुफ उघडून अश्लील चाळे केल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

अशातच आता मुंबईतील एका लोकलमध्ये वापरलेला कंडोम सापडल्याचा अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेक रेल्वे प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत. याबाबतचं वृत्त फ्री प्रेस जर्नल या वृत्तसंस्थेनं दिले आहे.

हेही पाहा- भर रस्त्यात बाईकवर एकमेकांना मिठी मारून किस केलं, Video व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी अंबरनाथ स्लो लोकल ट्रेनच्या सीटवर एका प्रवाशाला वापरलेला कंडोम आढळला. शिवाय हा कंडोम करी रोड येथे दिसला होता आणि ही लोकल डोंबिवलीला पोहोचेपर्यंत तो तसाच सीटवरच पडून होता. एका प्रवाशाने कंडोमचा फोटो ट्विट केला, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल होताच, मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मुंबई आरपीएफला (RPF) या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही पाहा- ‘या’ रीलमुळे पोलिसांनी तरुणीला ठोठावला १७ हजारांचा दंड; पोलीस म्हणाले, “Viral Video पाहून…”

मुंबईच्या लोकलमधील अस्वच्छतेमुळे रेल्वे प्रशासनावर अनेकदा टीका झाली आहे. मात्र, रेल्वेमध्ये अशी घटना घडण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. शिवाय हा कंडोम ज्या डब्यात सापडला तिथे सीसीटीव्ही कॅमेरा होता की नाही ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईच्या अनेक लोकल ट्रेनमध्ये CCTV कॅमेरे बसवलेले असले तरी या घटनेबाबतचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं नाही. या कंडोमचा फोटो @cinemaausher नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून त्यांने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये वापरलेला कंडोम आढळल्याचं म्हटलं आहे. शिवाय त्याने हे ट्विट रेल्वे विभागालाही टॅग केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 18:40 IST

संबंधित बातम्या