आपल्या देशात जुगाडू लोकांची कमतरता नाही. सोशल मीडियावर दररोज आपणाला नवनवीन जुगाडाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यातील काही आपल्याला थक्क करतात; तर काही पोट धरून हसायला भाग पाडतात. सध्या अशाच एका व्यक्तीने थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जुगाड केला आहे; ज्याचा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल यात शंका नाही. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीसच भारतात थंडीची चाहूल लागली होती. आता हळूहळू थंडी वाढत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करताना दिसत आहेत. काही जण स्वेटरद्वारे, तर कोणी टोपी घालून थंडीपासून बचाव करीत आहे; शिवाय काही काही लोक ठिकठिकाणी शेकोटीदेखील पेटवताना दिसत आहेत. पण, सध्या एका व्यक्तीने थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनोखा जुगाड केला आहे; ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सायकल आणि चप्पलमध्ये लावली आग

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चप्पल आणि सायकलच्या सीटमध्ये पेटते लाकूड ठेवल्याचे दिसत आहे. खरे तर सायकल किंवा चपलेमध्ये कोणीही पेटते लाकूड ठेवू शकत नाही; परंतु थंडीपासून बचावासाठी या व्यक्तीने हा अनोखा जुगाड केला आहे. त्याने चप्पल आणि सायकलच्या सीटमध्ये लाकूड जळत राहावे यासाठी खास जागादेखील बनवली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठीचे हे अनोखे जुगाड पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. शिवाय सध्या या जुगाडू चपलेचा आणि सायकलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा- शिळ्या भाकऱ्या खाऊन आनंदाने देशसेवा करतायत भारतीय जवान; हृदयस्पर्शी VIDEO पाहून त्यागाचे कौतुक कराल

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर studentgyaan नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक जण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, “भारतात वैज्ञानिकांची कमतरता नाही.” तर दुसर्‍या युजरने लिहिलं, “लोकांना काही कामे नाहीत म्हणून ते असले जुगाड करीत असतात.” तर काहींनी “हे धोकादायक ठरू शकतं”, असेही म्हटले आहे.