Viral Video : २५ आणि २६ ऑगस्ट रोजी सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. जन्माष्टमीनिमित्त ठिकठिकाणी दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जातात. लहान मुले शाळांमध्ये राधा कृष्णाची वेशभूषा परिधान करून जातात तसेच कॉलेजमध्ये सुद्धा अनोखा पद्धतीने जन्माष्टमी साजरी केली जाते.

सध्या सोशल मीडियावर जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये एक मुस्लीम जोडपे श्रीकृष्णाची वेशभूषा केलेल्या त्यांच्या चिमुकल्या मुलाला दुचाकीवर घेऊन जाताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

मुस्लीम जोडप्याचा चिमुकला कान्हा!

भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या धर्माचा आदर करतात. सणवार एकत्र साजरा करतात. एकमेकांच्या उत्सवात सहभाग घेतात. दिवाळी, होळी, गणपती उत्सव हा सण सर्व धर्माचे लोक साजरा करताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण तुम्ही कधी मुस्लीम बांधवांना जन्माष्टमी साजरा करताना पाहिले का?

या व्हिडीओमध्ये एक मुस्लीम जोडपे त्यांच्या मुलाला श्रीकृष्णासारखे सजवून दुचाकीवर नेताना दिसत आहे. कदाचित हा चिमुकला त्याच्या शाळेत श्रीकृष्ण बनलेला असू शकतो त्यामुळे त्याने श्रीकृष्णाची वेशभूषा केली आहे. बुरखा घातलेली त्याची आई त्याला कडेवर घेऊन दुचाकीवर डबलसीट बसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. हे भारतातच घडू शकते असे तुम्हाला वाटेल.

हेही वाचा : ९ थर लावणार इतक्यात…; जय जवान पथकाचे विश्वविक्रमाचे स्वप्न यंदाही अपूर्णचं, Video मध्ये पाहा नेमकी चुकलं काय?

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

View this post on Instagram

A post shared by Punjab Locals (@punjablocals)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

punjablocals या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एक मुस्लीम कुटुंबाने जन्माष्टमीनिमित्त त्यांच्या मुलाला कृष्ण बनविले आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्व धर्माचा आदर करा” तर एका युजरने लिहिलेय, “देवा, या मुलाला आणि त्याच्या पालकांना आशीर्वाद द्या.यालाच भारतीय प्रेम आणि संस्कृती म्हणतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हृदयस्पर्शी व्हिडीओ” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर करत देशाविषयी प्रेम व्यक्त केले आहेत.