किल्ले रायगडवर रविवारी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गडाच्या किल्ल्यावरून मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडीओमध्ये वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी रायगडाला भेट देणारे पर्यटक अडकल्याचे दिसत होते. पाण्याचा वेग इतका जास्त होता की त्याबरोबर एखादी व्यक्ती सहज वाहून जाऊ शकते. मोठ्या प्रयत्नाने लोक जीव मुठीत घेऊन उभे असलल्याचे दिसत होते. दरम्यान आता रायगडवरील पावसाचे रौद्र रुप दर्शवणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

रायगडाचे रौद्र रुप पाहून अंगावर येईल शहारा

व्हायरल व्हिडीओमध्ये रायगड किल्याच्या पायऱ्यांवरून मोठ्या वेगाने पाणी वाहताना दिसत आहे. हिरव्यागार डोंगरामधून वाट मिळेल तेथून मोठ्या वेगाने वाहणारे धबधबे दिसत आहे. बुरुज आणि कड्यांवरून पाण्याचा प्रवाहाचा जोरदार आहे की जो पाहून अंगावर काटा उभा राहील. गडावर काही ठिकाणी पर्यटक अडकल्याचे दिसत आहे.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Pune shocking video A bike rider fell into a drainage in Pune's Narhe area
पुण्यात हे काय चाललंय? बाईकवरून जाताना तोल गेला; तरुण गाडीसह ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला, पुण्याचा थरारक Video

हेही वाचा – ९ वर्षांच्या चिमुकलीचे गाणे ऐकून आनंद महिंद्राचे डोळे आले भरून, केले तोंडभरून कौतूक; पाहा Viral Video

येथे पाहा व्हिडीओ

गड किल्यांना भेट देताना काळजी घ्या

इंस्टाग्रामवर _.amol.__96kनावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सह्याद्री कधी त्याचे भीषण असे रौद्र रुप दाखवेल काही सांगता येत नाही, तरीही किल्ल्यांवर जाताना काळजी घ्या. पावसाचा अंदाज घेऊन तुमचे प्लॅन करा.”

हेही वाचा – “सून असावी तर अशी!” ‘या’ आहेत आजकालच्या सासूच्या अपेक्षा, प्रत्येक सुनेने पाहिला पाहिजे हा Viral Video

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, या सरकारने महाराजांच्या गडकिल्यांकडे लक्ष द्यायला हवं. स्वार्थी हरामखोर राजकारणी गडकिल्यांची अवस्था पाहून सह्याद्रीने रौद्र रूप धारण केले आहे आता तरी जागे व्हा.” दुसऱ्याने लिहिले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी उगाचच हिंदवी तख्त म्हणून रायगडाची निवड केली नाही. पावसाळी काळ , सावित्री, गांधारी या सर्व नद्या पूर्ण क्षमतेने वाहतात आणि आपोआपच गड हा पावसाळी ३ ते ४ महिने सुरक्षित राहतो. हे त्यातीलच एक उदाहरण आहे बाकी काही नाही!” तिसऱ्याने लिहिले की, “खरा अर्थ असा आहे की,”देवाने रायगडाचे पाण्याने अभिषेक केला.” चौथ्याने लिहिले की,”चला वर्षभर केलेला कचरा आणि कचरा करणारे कचरा लोक थोडे दिवस लांब राहतील रायगडा पासून”

किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस

पावसाचे स्वरुप लक्षात घेता ८ जुलै पासून म्हणजेच आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे, यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

Story img Loader