ब्राझीलच्या विमानतळ प्राधिकरण इन्फ्रारोने शुक्रवारी सांगितले की त्यांनी रिओ दि जानेरो येथील विमानतळावरील इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले उघडपणे हॅक झाल्याबद्दल फेडरल पोलिसांना सूचित केले आहे. या डिस्प्लेवर जाहिराती आणि विमानाच्या माहितीऐवजी प्रवाशांना अश्लील चित्रपट दाखवले जात होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये असे दिसत होते की सॅंटोस ड्युमॉन्ट विमानतळावरील प्रवासी डिस्प्लेवर हसत होते, त्यांच्या मुलांपासून डिस्प्ले लपवत होते किंवा फक्त स्तब्ध उभे होते. विमानतळ प्राधिकरणाच्या निवेदनात म्हटले आहे की त्यांची माहिती सेवा दुसर्‍या कंपनीकडे आउटसोर्स केली जाते, ज्याला त्यांनी सूचित केले आहे.

२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल

“आमच्या मीडिया स्क्रीनवर दाखवलेला कन्टेन्ट ही जाहिरात अधिकार असलेल्या कंपन्यांची जबाबदारी आहे, आम्ही यावर ठाम आहोत.” असे इन्फ्रारो म्हणाले. त्यांनी असे म्हटले आहे की त्याचे भागीदार त्यांच्या स्वतःच्या प्रकाशन प्रणाली वापरतात, ज्याचा इन्फ्रारोच्या फ्लाइट माहिती प्रणालीशी कोणताही संबंध नाही. इन्फ्रारो म्हणाले की त्याने हॅक केलेल्या स्क्रीन बंद केल्या आहेत.

जेव्हा धक्का बसलेल्या आणि गोंधळलेल्या प्रवाश्यांनी सॅंटोस ड्युमॉन्ट विमानतळावरील स्क्रीनच्या प्रतिमा पोस्ट केल्या, तेव्हा हॅकची बातमी उघड झाली आणि ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. यावर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. “असे दिसते की आज बर्‍याच लोकांची फ्लाइट चुकली,” असे एका ट्विटर वापरकर्त्याने सांगितले. “सँटोस ड्युमॉन्ट एअरपोर्नमध्ये आपले स्वागत आहे,” दुसर्‍याने लिहिले.

Video: ईडन गार्डन्सवरील ‘जॉन सीना’ चर्चेत; मैदानातील त्याची करामत पाहून कोहलीही क्षणभर झाला स्तब्ध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्राझीलचे विमानतळ ऑपरेटर, इन्फ्रारो यांनी सांगितले की, मॉनिटर्स एका खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणार्‍या जाहिरातींचे स्क्रीन होते, अधिकृत माहितीचे प्रदर्शन नाही. “इन्फ्रारोने योग्य कायदेशीर कारवाई केली आहे आणि फेडरल पोलिसांकडे केस दाखल केली आहे,” असे एका निवेदनात म्हटले आहे. “जोपर्यंत याच्यासाठी जबाबदार कंपनी त्यांच्या सुरक्षिततेची हमी देत ​​नाही तोपर्यंत आमच्या विमानतळ नेटवर्कमधील मॉनिटर्स बंद राहतील.” असेही त्यांनी म्हटले आहे.

या घटनेवर सगळेच हसत होते असे नाही. एका सोशल मीडिया युजरने लिहिले, “कल्पना करा की लोक मुलांसोबत प्रवास करत आहेत. किती लज्जास्पद आहे हे.”