Bullet accident video: दिवसभरात आपल्या अजूबाजूला एकतरी अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा अपघात कधी चालकाच्या चुकीमुळे घडतो, तर कधी तो तांत्रिक बिघाडामुळे घडतो. यामध्ये चालकाच्या चुकीमुळे घडलेल्या अपघाताची संख्या जास्त आहे. त्यामुळे चालकाने जर मनावर ताबा आणि संयम ठेवला तर असे अपघात कमी करता येतात. परंतु आज कालची तरुण मंडळी ही आपल्या जीवाची जराही पर्वा करत नाहीत.
परंतु यामुळे ते फक्त स्वत:चंच नाही तर दुसऱ्याचं देखील नुकसान करतात. यासंदर्भात तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे असे व्हिडीओ आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत असतात. हेच व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात. तसेच येथे आपल्याला असे काही व्हिडीओदेखील पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.
एके काळी बुलेटचा आवाज आला की, दूधवाला आला अशीच या गाडीची ओळख होती. पण, आता या गाडीची तरुणांमध्ये क्रेझ आहे. स्वस्तातील फोरव्हीलरपेक्षा महाग असलेल्या या गाडीमुळे रुबाब वाढतो, असे तरुणाईचे ‘इंप्रेशन’ आहे. त्यामुळेच आता कॉलेजच्या पार्किंगमध्ये बुलेट दिसू लागली आहे. मात्र याचमुळे बरेच अपघातही होत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या तरुणानं अक्षरश: हद्दच पार केलीय. तो चक्क ११० च्या स्पीडवर बुलेट चालवत आहे. मात्र याचे परिणाम त्याला पुढच्याच क्षणी भोगावे लागतात. बुलेटचं नियंत्रण सुटतं यावेळी तो स्पीड कमी करण्यासाठी ब्रेक दाबतो आणि भयंकर अपघात होतो. बुलेट चालवणारा तरुणही रस्त्यावर पडतो.
पाहा व्हिडीओ
veritasofindia नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ जोरदार चर्चेत आला आहे. याशिवाय थोड्याच वेळात व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.