अफगाणिस्तानमधील सर्व सूत्र तालिबानच्या हाती आल्यानंतर तिथल्या परिस्थितीत तात्काळ बदल झाला आहे. अफगाणिस्तानातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष करून महिला वर्गामध्ये दहशत पसरली आहे. अनेक अफगाणी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमधील भीषण परिस्थितीचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. अफगाणिस्तानमधील दाहकतेचे वास्तव पाहून कुणाच्याही काळजाला तडे जातील. अशातच एक अफगाणी महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा एका व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा काबूल विमानतळावरील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये एका अफागाणी महिलेने स्वत:च्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जे काही केले आहे ते पाहून डोळ्यातून अश्रू येतील. या मातेने आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी मातृत्वाचा त्याग करत तान्ह्या बाळाला अमेरिकन सैन्याकडे सोपवले आहे. अमेरिकन सैनिक तारेच्या कुंपणावरुन त्या बाळाला त्यांच्याकडे घेत असल्याचे दिसत आहे. अक्षरश: हृदय पिळवटून टाकणारा हा काबूल विमानतळावरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: ज्या पार्कात ‘डॅश कार’ खेळले त्या पार्कचं तालिबान्यांनी नंतर काय केलं पाहिलं का?

यापूर्वी काबूल विमानतळावरील व्हिडीओ समोर आले होते. सोमवारपासून हजारो अफगाणिस्तानातील नागरिक काबूक विमानतळावर असल्याचे दिसत होते. तालिबानने काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर देश सोडण्यासाठी हे नागरिक धडपडताना दिसत आहेत. काही व्हायरल व्हिडीओमध्ये नागरिक काबूल विमानतळावर अमेरिकन लष्कराच्या सी -१७ विमानासमोर पळताना दिसत होते. अमेरिकन हवाई दलाने केलेल्या तपासणीमध्ये सी १७ विमानाच्या चाकांमध्येही मानवी अवशेष आढळून आलेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A soldier grips a child as parents try to get their child out of the country avb
First published on: 20-08-2021 at 13:59 IST