Viral Video : शाळा आणि कॉलेज हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक खास प्रवास असतो. अभ्यास करणं, मस्ती करणं यांसोबत शिक्षकांबरोबरही विद्यार्थ्यांचं एक घट्ट नातं तयार होतं. अशातच शाळेत किंवा कॉलेजमध्ये आवडत्या शिक्षकाचा तास (lecture) नसेल, तर अनेक विद्यार्थी बाकावर डोकं ठेवून झोपून जातात किंवा शेजारी बसलेल्या विद्यार्थ्यासोबत गप्पा मारताना दिसून येतात. आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एक विद्यार्थी लेक्चर चालू असताना वर्गात झोपतो आणि शिक्षक स्वतःच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्याचा गमतीशीर व्हिडीओ शूट करतो; जो पाहून तुम्ही पोट धरून हसाल..

व्हायरल व्हिडीओ कॉलेजमधील वर्गाचा आहे. अनेक तरुण मंडळी वर्गात लेक्चरसाठी हजर राहिली आहेत. त्यातच एक विद्यार्थी हाताची घडी घालून बाकावर बसला आहे. मजेशीर गोष्ट अशी की, विद्यार्थी हाताची घडी घालून झोपला आहे आणि आजूबाजूचे विद्यार्थी त्याच्याकडे बघून हसताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थी झोपलेला पाहून शिक्षक येतात आणि मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ शूट करताना दिसतात. या मजेशीर क्षणाचा व्हिडीओ काही विद्यार्थीदेखील त्यांच्या मोबाईलमध्ये टिपून घेताना दिसत आहेत. लेक्चरमध्ये झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुम्हीसुद्धा एकदा बघाच…

हेही वाचा… नरेंद्र मोदींनी ‘७५ हार्ड डे’ चॅलेंज फेम अंकितची घेतली भेट; इन्फ्लूएंसरने पंतप्रधानांना सांगितला फिटनेस प्लॅन

व्हिडीओ नक्की बघा :

झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्याचा काढला व्हिडीओ :

झोप काढणाऱ्या विद्यार्थ्याला पाहून शिक्षक त्यांच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्याचा व्हिडीओ शूट करतात. व्हिडीओ काढत असताना तरुणाला त्या क्षणी जाग येते आणि तो दचकतो व चेहऱ्यावर हात ठेवतो. त्यानंतर शिक्षक वर्गात उपस्थित इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडीओ दाखवतात आणि सगळे विद्यार्थी हे पाहून पोट धरून हसताना दिसतात. अनेक वेळा शिक्षक कोमल मनाचे असतात, त्यांच्यात इतकी आपुलकी असते की, ते विद्यार्थ्यांवर अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करतात. आज या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं. लेक्चरमध्ये विद्यार्थी झोपी गेला तरीही शिक्षकाने गमतीशीर पद्धतीनं त्याचा व्हिडीओ शूट केला आणि वर्गातील वातावरण अगदी आनंदी केलं.

मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर @kuls.itham या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. विद्यार्थी वर्गात झोपले की, त्यांना शिक्षक शिक्षा देतात किंवा ओरडतात; पण या शिक्षकानं तसं न करता विद्यार्थ्यांसोबत या क्षणाचा आनंद लुटला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेकांना शाळेचे जुने दिवस आठवले आहेत. तसेच काही शिक्षक ‘माझे विद्यार्थीसुद्धा असंच करतात’, असे आवर्जून सांगताना दिसत आहेत. तसेच व्हिडीओ पाहून तरुण मंडळी वर्गात झोपा काढणाऱ्या मित्रांना कमेंटमध्ये टॅग करतानादेखील दिसून येत आहेत.