सोशल मीडियावर नवरा-बायकोमधील भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही धक्कादायक असतात. अनेकदा नवरा बायकोमधील किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोहचल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित होऊ शकता. कारण व्हिडीओतील नवरा-बायको एकमेकांना अशा पद्धतीने मारहाण करत आहेत की, आता ते एकमेकांचा जीव घेतात की काय? असा प्रश्न व्हिडीओ पाहणाऱ्यांना पडला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरा सुटकेस घेऊन कामावर निघाल्याचं दिसत आहे. मात्र नवरा कामावर जाणार असल्याची माहिती त्याने त्याच्या बायकोला दिली नव्हती शिवाय त्याने तिच्याकडून जाण्याची परवानगीही घेतली नव्हती त्यामुळे आपला नवरा आपणाला न सांगता कामावर निघाल्याचं बायकोला समजताच ती संतापते. ती संतापलेली असतानाच तिचा नवरा सुटकेस घेऊन घरातून बाहेर आल्याचं दिसतं, त्यामुळे ती जास्तच रागवते आणि नवऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र बायकोने अवडल्याचा नवऱ्यालाही राग येतो आणि दोघांमध्ये भांडण सुरू होतं.

हेही पाहा- VIDEO : चार महिन्यांपासून शवागाराबाहेर मालकाची वाट पाहतोय ‘हा’ कुत्रा; हृदयस्पर्शी कहाणी वाचून पाणावतील तुमचेही डोळे

वीट उचलली अन्…

व्हिडीओत दिसत आहे की, रागवलेला नवरा बायकोला धडा शिकवण्यासाठी हातात वीट उचलतो. मात्र, तो तिला वीट मारत नाही तर ती रागाने खाली टाकतो. मात्र खाली पडलेली वीट त्याची बायको उचलते आणि नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिच्याही हातातून वीट निसटते आणि खाली पडते. यानंतर, नवरा तिला खाली वाकवतो आणि तिच्या पाठीवर मारहाण करायला सुरुवात करतो आणि सुटकेस घेऊन निघून जातो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तो ठरवून शूट केल्याचं म्हटलं आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, “दोघेही कॉमेडी करत आहे. मला वाटतं हे नाटक आहे.” तर आणखी एका यूजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे, त्याने लिहिलं, “माझ्या लग्नानंतर अशी भांडणे झाली नाहीत तर मी घटस्फोट घेईन.” आणखी एक युजरने लिहिलं, “देव या जोडप्याला सुरक्षित ठेवो.”