आपल्या देशातील लोक खूप धार्मिक आहेत, त्यामुळे देशातील अनेक मंदिरांमध्ये आपणाला भाविकांची गर्दी पाहायला मिळते. विकेंडला किंवा एखाद्या सणाच्या दिवशी अनेक मंदिरं भाविकांच्या गर्दीने गजबजून जातात. मात्र, अशावेळी अनेकांना दर्शन रांगेत थांबण्याचा कंटाळा येतो.

मात्र, सध्या अशा एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी म्हणत आहेत की, अशी टेक्निक असेल तर आपण कोणत्याही मंदिरात सहज आणि लवकर दर्शन घेऊ शकतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका मंदिराच्या गर्भगृहातील देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असल्याचं दिसत आहे. ती रांगेत एवढी गर्जी दिसत आहे की, ज्यामध्ये लोकांना हलताही येत नाहीये.

हेही वाचा- नवरदेवाच्या गळ्यात पैशांच्या नोटांचा हार घालणं पडलं महागात, स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी सर्वांसमोर…

लोक गर्दीत आपला नंबर येण्याची वाट पाहात उभी असतानाच एक महिला आपले केस मोकळे सोडते आणि उड्या मारत रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना डावलून पुढे जाताना दिसत आहे. या महिलेचा अवतार पाहून रांगेत उभे असलेले इतर लोक घाबरल्याचं पाहायला मिळत आहे.

महिलेला घाबरुन पळाले भाविक –

महिलेचा अवतार पाहून इतर भाविक पळाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी या महिलेच्या कृत्यावर टीका केली आहे. तर अनेकांनी प्रत्येकाने अशी पद्धत वापरुन दर्शन रांगेतून पुढं जायला हवं असं म्हणत आहेत. व्हायरल होत असलेल्या या महिलेचा व्हिडीओ वैशाली (@Kokanchi_Rani) नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मंदिराच्या रांगेतील गर्दीपासून वाचण्याचा सर्वात सोप्पा पर्याय.’

हेही पाहा- मुलीकडच्या मंडळींनी दिलेल्या हुंड्यावर संशय घेत स्वत:च्या लग्नालाच गैरहजर राहिला नवरदेव

नेटकऱ्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या महिलेच्या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, रांगेत उभं राहायची गरज नाही. तर आणखी एकाने महिलेच्या अंगात देव आल्याचं म्हटलं आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून आम्हाला हसू आवरणं कठिण होत असल्याचंही एका नेटकऱ्यांने म्हंटल आहे.