Viral Video : वारकरी हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय असा भक्तिसंप्रदाय आहे. वारी करणारा वारकरी या अर्थाने हा शब्द वापरला जातो. दरवर्षी हजारो वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरच्या दिशेने पायी निघतात. ही वारी जगप्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची एक ओळख आहे.

सोशल मीडियावर वारकऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. फक्त वारी दरम्यानच नाही तर वर्षभर वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसतात. गावोगावी किर्तन, सप्ताह, भजनांचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि तिथे हे वारकरी आवर्जून हजर राहतात.

सध्या असाच एका किर्तनाच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वारकरी अप्रतिम ढोलकी वादन करताना दिसत आहे. या वाकरऱ्याचे ढोलकी वादन पाहून कोणीही थक्क होईल.

हेही वाचा : ‘सतर्क राहून, कुशलतेने आव्हानांचा सामना’, नव्या गव्हर्नरांचे धोरणसातत्यावर भर राखण्याचे प्रतिपादन

हा व्हायरल व्हिडीओ एका किर्तन कार्यक्रमातील आहे. महाराज उभे राहून किर्तन करत आहेत तर काही त्यांचे वादन करणारे सहकारी खाली बसलेले आहेत. त्यातील एक ढोलकी वादन करणारा वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तो अप्रतिम ढोलकी वाजवताना दिसतो. अनेक जण त्याचा व्हिडीओ काढताना सुद्धा दिसतात. सर्व जण कौतुकाने त्याच्याकडे बघताना दिसत आहे आणि त्यानंतर जोरजोराने टाळ्या वाजवताना दिसत आहे. या वारकऱ्याचे अप्रतिम ढोलकी वादन पाहून कोणीही अवाक् होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “वाघानं राडाच केला. याला म्हणतात चपळता. सगळे पाहतच राहिले”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : आणखी काय हवं? नवऱ्याने खेळ जिंकण्यासाठी बायकोची केली अशी मदत की… VIRAL VIDEO जिंकतोय सगळ्यांचे मन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mrudang_sadhana_gurukul या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अंगावर काटा च आला” तर एका युजरने लिहिलेय, “ज्या रंगानी आख्य आयुष्य रंगमय झाले तोच रंग म्हणजे पांडुरंग” आणखी एका युजरने लिहिलेय, “धन्य आहे ती माऊली तुम्ही तिच्या पोटी जन्माला आलात रामकृष्ण हरी माऊली” एक युजर लिहितो, “आनंदचा सोहळा सुखाचा दरबार माझा संत परिवार जय हो” तर एका युजरने लिहिलेय, “ह्या सभेत उपस्थित लोकांमुळे आपली संस्कृती परंपरा टिकुन आहे” अनेक युजर्सनी या वारकऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी ‘राम कृष्ण हरी’ असे लिहिलेय.