मुंबई : सातत्य आणि स्थिरतेवर भर देत, सध्याच्या अस्थिर जागतिक आर्थिक आणि राजकीय वातावरणाच्या आव्हानांचा सतर्क राहून आणि कुशलेतेने सामना केला जाईल, असे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी त्यांच्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेत निर्धार व्यक्त केला. मध्यवर्ती बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

रिझर्व्ह बँकेसारख्या प्रतिष्ठित संस्थेचे नेतृत्व करणे हा एक सन्मान आहे आणि सन्मानापेक्षाही ही एक मोठी जबाबदारी आहे. रिझर्व्ह बँकेचा वारसा कायम ठेवणार असून या अंगाने धोरण स्थिरता आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. या संस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील, असे मल्होत्रा म्हणाले.

wipro q3 results profit jumps 24 percent to rs 3354 crore
विप्रोचा नफा २४ टक्के वाढीसह ३,३५४ कोटींवर
1000 companies expected to bring ipo in next 2 years
दोन वर्षांत १,००० कंपन्यांची ‘आयपीओ’साठी रीघ; तीन लाख…
Indian economic growth
दोन आर्थिक वर्षांत ६.७ टक्के विकास दराने भारताचे मार्गक्रमण – जागतिक बँक
stock market close it stocks decline at the end of the week sensex lost 423
‘आयटी’मुळे सप्ताहअखेर घसरणीने; ‘सेन्सेक्स’चे ४२३ अंशांनी नुकसान
Forex Reserves Fall For Sixth Straight Week
परकीय चलन गंगाजळी घटून ६२५ अब्ज डॉलरवर; उच्चांकी पातळीपासून ८० अब्ज डॉलरचे नुकसान
Gold Silver Price Today 17 january 2025
Gold Silver Price Today : सोन्या- चांदीच्या दरात मोठे बदल, तुमच्या शहरात आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर किती? वाचा
90000 salaried employees withdrew incorrect tax deduction claims worth rs 1070 crore
तब्बल ९० हजार  पगारदारांच्या कर वजावटीत गल्लत ; सुमारे १,०७० कोटींची सदोष करबचत केल्याचा उलगडा
milind kale appointed as chairman of the board of management of cosmos bank
कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद काळे
India to remain fastest-growing large economy in FY26, FY27
भारताच्या आर्थिक भक्कमतेबाबत आशावाद; २०२५ मध्ये जागतिक अर्थस्थिती मात्र कमकुवत; प्रमुख जागतिक अर्थतज्ज्ञांच्या या सुसंकेतामागील कारण काय?

हेही वाचा : विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री

स्थिरता महत्त्वाची असली तरी, आपण सतत बदलणाऱ्या जगात वावरत आहोत. इतर संस्थांप्रमाणे, एकाच गोष्टीमध्ये आपण अडकून राहू शकत नाही. धोरणसातत्य राखताना कायम सावधगिरी आणि चपळतेने निर्णय आवश्यक ठरेल. आमच्याकडे सर्व ज्ञानाची मक्तेदारी नाही, असे सांगत इतर सहभागींशी विस्तृत सल्लामसलतीच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. शिवाय वित्तीय नियामक म्हणून, विविध राज्य सरकारे आणि केंद्रासह सर्व विभागांशी संवाद साधत राहणार असल्याचे मल्होत्रा यांनी नमूद केले.

हेही वाचा : अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ

मध्यवर्ती बँकेची सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे बँकिंग क्षेत्रासह आर्थिक समावेशनाचा प्रसार करणे आहे. त्यामुळे भविष्यात आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल, असे त्यांनी सूचित केले. आयआयटी-कानपूरमधून संगणक विज्ञानाची पदवी संपादन केलेल्या मल्होत्रा यांनी अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण या विषयांतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारणारे ते सलग दुसरे सनदी अधिकारी आहेत. नवीन जबाबदारीवर येण्याआधी केंद्रीय अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून ते कार्यरत होते.

Story img Loader