काही लोक फक्त पोट भरण्यासाठी खातात, तर काही जणांसाठी खाणे हे एक इमोशन आहे. ते फक्त पोट भरण्यासाठी खात नाहीत, तर खाण्यामुळे त्यांना आनंद मिळतो. अनेकांना तर खाण्यामुळे एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यात लोक वेगवेगळे पदार्थ ट्राय करतात आणि खाण्याच्या नवीन पद्धती शोधतात. इंस्टाग्राम, यूट्यूबवरही अनेकांनी फूड ब्लॉगिंग करायला सुरुवात केली आहे. हे व्हिडीओ जगभर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना नवी ओळख मिळते. त्यांच्यापैकी काही असे आहेत जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा विचार करतात.

याच संबंधी नुकतीच एक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, एका महिलेने एका मिनिटात सर्वाधिक चिकन नगेट्स खाण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे. ब्रिटनच्या स्पीड-इटर लिआ शटकेव्हरला चिकन नगेट्स खाताना पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव आहे. तिने एका मिनिटात १९ चिकन नगेट्स (३५२ ग्राम) खाण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, तीन मिनिटांत सर्वाधिक चिकन नगेट्स (७७५.१ ग्रॅम) खाण्याच्या शीर्षकासह, लिआच्या नावावर आधीपासूनच अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.

Optical Illusion : तुम्ही ‘या’ चित्रामध्ये सर्वात आधी काय पाहिले? यावरून ओळखता येईल तुमचं व्यक्तिमत्त्व

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पीड-ईटर लिआ शटकेवरचे रेकॉर्ड:

  • सर्वात वेगवान तीन मिन्स पाई खाण्याचा रेकॉर्ड (२०१९ मध्ये, ५२.२१ सेकंद)
  • तीन पिकल्ड एग सर्वात जलद खाण्याचा विक्रम (२०१९ मध्ये ७.८० सेकंद)
  • हाताचा स्पर्श न करता सर्वात जलद मफिन खाण्याचा विक्रम (२०१९ मध्ये २१.९५ सेकंद)
  • हाताचा स्पर्श न करता एका मिनिटात सर्वात जलद मार्शमॅलो खाण्याचा विक्रम (२०२० मध्ये २० मार्शमॅलो)
  • एका मिनिटात सर्वाधिक टोमॅटो खाण्याचा विक्रम (२०२० मध्ये ८ टोमॅटो)

लिआला लहानपणापासूनच पटापट जेवायची सवय आहे. ती २३ वर्षांची असताना एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना तिच्या भावाने तिला आव्हान दिले. तेव्हापासूनच ती लवकरात लवकर जेवण संपवण्याचा प्रयत्न करत असते. आज तिने स्वतःच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत. ती म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित करता आणि ते साध्य करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि मला वाटते की माझ्या आयुष्यातील हा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे.