वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, वाहन चालवताना हेम्लेट घाला, असे वारंवार वाहतूक पोलिस यांच्याकडून सूचना देण्यात येतात. मात्र, अनेकदा पोलिस अधिकारीच या नियमांचे उल्लंघन करतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलिस अधिकारी प्रवासादरम्यान वाहतूक नियमाचे उलंघन करताना दिसत आहे, हे पाहून एक अज्ञात महिला त्यांना हेल्मेट घालून गाडी चालवण्यास सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ पोलिस अधिकारी आणि अज्ञात महिलेचा आहे. महिला एका तरुणीबरोबर प्रवास करीत असते. प्रवासादरम्यान रस्त्यावरून जाताना तिला एक पोलिस अधिकारी रस्त्यावरून दुचाकी चालवताना दिसतो. पण, यादरम्यान त्याने हेल्मेट घातलेले नसते. मग महिला हे पाहून गाडीमधूनच पोलिस अधिकाऱ्याला हेल्मेट का घातले नाही, असे विचारते. महिलेने पोलिस अधिकाऱ्याला कशा प्रकारे नियमाची आठवण करून दिली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा…
व्हिडीओ नक्की बघा :
पोलिस अधिकाऱ्याला करून दिली नियमाची आठवण :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल, महिलेच्या गाडीच्या बाजूने दुचाकीवरून जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला महिला अगदीच धाडसाने जाब विचारते की, तुमचे हेल्मेट कुठे आहे, हेल्मेट का घातले नाही, असे विचारताच पोलिस अधिकाऱ्याकडेही या प्रश्नाचे उत्तर नसते. तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्याला हेल्मेट घालण्याची विनंती करते. महिलेने स्वतः या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तसेच महिलेची ही अनोखी स्टाईल अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे.
एक अज्ञात तरुणी गाडी चालवत असते आणि महिला तिच्या शेजारी बसलेली असते. हा व्हिडीओ रेकॉर्ड करीत असते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ghrkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच मुंबई ट्रॅफिक पोलिस यांनी या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत ‘कृपया पुढील कारवाईसाठी आम्हाला या परिसराची अचूक माहिती द्या’, अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्यांकडून पोलिस अधिकाऱ्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.