अनेकदा काही लोक काम करण्यात इतके गुंग होतात की, त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय आहे याचे भान राहत नाही. असं एखादे काम मन लावून करणं कधी कधी खूप फायदेशीर ठरते. पण सध्या एका महिलेला लग्नाच्या कार्यक्रमात फोटो काढण्यात गुंग होऊन आजुबाजूला न पाहणं महागात पडलं आहे. हो कारण सध्या अशा एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीदेखील इथून पुढे फोटो काढताना आपल्या आजुबाजूला लक्ष द्याल यात शंका नाही.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला फोटो काढण्यात इतकी मग्न होती की, तिला शेजारी असलेल्या नाल्याचंही भान राहत नाही आणि ती थेट खराब पाण्यात पडल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या या महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. शिवाय महिला ज्या पद्धतीने नाल्यात पडली आहे ते पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठिण होत आहे.

हेही वाचा- दुचाकीच्या नंबर प्लेटवरचा भगव्या रंगातील ‘तो’ मजकूर तरुणाला पडला महागात; पोलिसांनी केली मोठी कारवाई

नेमकं काय घडलं ?

व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न झाल्यानंतर वधूला निरोप दिला जात असताना एक महिला हे क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात फोटो काढत आहे. फोटो काढताना ही महिला मागे मागे जाते त्यावेळी तिच्या मागे असणाऱ्या मोठ्या नाल्यात ती कोसळते आणि क्षणात खराब पाण्यात पुर्णपणे बुडते.

हेही वाचा- Viral Photo: कस्टम विभागाने विमानतळावर जप्त केली सोन्याची काळी अंडी; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना पाहून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. सुदैवाने या अपघातात महिलेला कोणतीही जखम झाली नाही. कारण तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी तिला तत्काळ पाण्यातून बाहेर कढलं. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.