सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला आश्चर्यचकित करतात तर काही आपलं मनोरंजन करतात. शिवाय आजकाल सोशल मीडियावर जे गाणे ट्रेंड करत असेल, त्या गाण्यावर रील बनवण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत अनेकजण ट्रेंडिंग गाण्यावर थिरकतात. ज्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही याआधीही पाहिले असतील.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर बाप-लेकीने जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओने अनेक लोकांची मने जिंकल्यांचही पाहायला मिळत आहे. या दोघांचा व्हिडीओ पाहिल्यांनतर नेटकरी ही बाप-लेकीची जोडी अप्रतिम असल्याचंही म्हणत आहेत.

हेही पाहा- थंडीपासून बचाव करण्यासाठी पठ्ठ्याचा विचित्र जुगाड, व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

बाप-लेकीचा जबरदस्त डान्स व्हायरल –

सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक ऐकल्या जाणाऱ्या गाण्याच्या यादीत पहाडी गाणे ‘गुलाबी शरारा’ पहिल्या क्रमांकावर आहे. प्रत्येकजण या गाण्यावर रील बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. नुकतेच एका शाळेतील शिक्षिकेने याच गाण्यावर विद्यार्थ्यांबरोबर डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता या वडील आणि मुलीच्या सुंदर जोडीचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओतील वडील आणि मुलीचा डान्स पाहून नेटकरी त्यांचे चाहते झाले आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर yodhakandrathi नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ७.५ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, “ही मुलगी खूप भाग्यवान आहे की तिला असे सपोर्टिव्ह वडील मिळालेत.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “तुम्ही दोघेही अप्रतिम आहात.”