Viral Video : लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. लावणी या महाराष्ट्रीयन नृत्य कलेने अख्ख्या जगाला वेड लावले आहे. सहसा महिला लावणी नृत्य सादर करतात पण अलीकडे पुरुष मंडळी सुद्धा आवडीने लावणी नृत्य सादर करताना दिसतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण अप्रतिम अशी लावणी सादर करताना दिसत आहे. या तरुणाची लावणी पाहून कोणीही थक्क होईल. (A young boy performed amazing lavani dance people love his dance and shower money by praising him)

तरुणाने सादर केली जबरदस्त लावणी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक स्टेज दिसेल. हा स्टेज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातील आहे. या स्टेजवर एक तरुण अप्रतिम अशी लावणी सादर करताना दिसत आहे. तरुणाने महाराष्ट्रीयन नऊवारी आणि मराठमोळे दागिने घातलेले आहे. हा तरुण नऊवारी नेसून लावणी सादर करत आहे. चंद्रा या लोकप्रिय गाण्यावर तो लावणी सादर करताना दिसत आहे. त्याच्या प्रत्येक डान्स स्टेप्स आणि हावभावावर लोक टाळ्या वाजवत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

लावणी सादर करणाऱ्या तरुणाने lavny_rk या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या तरुणाचे नाव राहुल काटे आहे. तो एक लोक कलाकार आणि लावणी डान्सर आहे. सोशल मीडियावर तो त्याच्या डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो.

हेही वाचा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

तसेच या तरुणाने याच लावणी नृत्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो सुद्धा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याचे हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून लोक वेडे झाले आहेत. काही लोक टाळ्या तर काही लोक शिट्ट्या वाजवत आहे. एक जण तर या तरुणावर पैसे ओवाळण्यासाठी स्टेजवर येतो.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

त्याच्या या लावणी नृत्यावर अनेक युजर्सनी लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे. काही लोकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी सुद्धा असे अनेक तरुणांचे लावणी करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या मरीन ड्राइव्हजवळ दोन तरुणांचा लावणी करतानाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता.