Viral Video : अळ्या किंवा किडे खाणाऱ्या अनेक प्रजातीविषयी तुम्ही ऐकले असेल किंवा वाचले असेल पण तुम्ही कधी माणसाला अळ्या किंवा किडे खाताना पाहिले आहे का? एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी जीवंत अळ्या खाताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना किळस येईल तर काही लोकांना आश्चर्य वाटेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर दरदिवशी अनेक थक्क किंवा अचंबित करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात पण तरुणीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही क्षणभरासाठी स्तब्ध व्हाल. ती ज्या प्रकारे अळ्या खात आहे, ते पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. मुरमुरे जसे लोक सहज खातात तशी ही तरुणी अळ्या खातेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी निसर्गरम्य वातावरणात बसलेली आहे. तिच्यासमोर हिरव्या पानांवर खूप साऱ्या अळ्या दिसत आहे. ती अळ्या हातात घेते आणि चक्क खाते. व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी तुम्हीही अवाक् व्हाल. ती फरसाणसारखी आवडीने जीवंत अळ्या खात आहे. तुम्हाला वाचायला विचित्र वाटेल पण ती अळ्या खाताना मनसोक्त आनंद घेत दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या देशातील आहे, याविषयी माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा : चिप्सच्या पुड्यांनी सजवली नवरदेवाची गाडी, नेटकरी म्हणाले, ” थेट दुकानच आणलं लग्नमंडपात” पाहा Viral Video
la_nativa1296 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ लाखो लोकांनी बघितला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “ही मुलगी अळ्या अशी खातेय जणू काही मुरमुरे खात आहे” तर एका युजरने लिहिलेय, “या लोकांसाठी ही भेळ आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “बापरे, कोणी अळ्या कसं खाऊ शकतो? हा व्हिडीओ पाहून काही लोक अवाक् झाले आहे तर काही लोकांना व्हिडीओ पाहून विश्वास बसत नाही.
