scorecardresearch

Premium

तरुणाचा अनोखा जुगाड ! पाण्यात चालणारी सायकल केली तयार… Video बघतच रहाल

सोशल मीडियावर एका तरुणाने पाण्यात चालणारी सायकल तयार केली आहे

A young man built a bicycle that runs on water
(सौजन्य:इन्स्टाग्राम/@itsmrvirender) तरुणाचा अनोखा जुगाड ! पाण्यात चालणारी सायकल केली तयार… Video बघतच रहाल

Viral Video : पर्यटकांसाठी अलिबाग, गोवा या ठिकाणी समुद्रावर वॉटर स्पोर्ट्स यांचे आयोजन केले जाते. बोटिंग, विविध वॉटर स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंग आदी अनेक गोष्टींचा यात समावेश असतो. तर आज गावाकडच्या तरुणाने तलावाच्या पाण्यात वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी एक अनोखा जुगाड केला आहे. तरुणाने पाण्यात चालणारी सायकल तयार केली आहे, जे पाहून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल.

सगळ्यात आधी व्हिडीओत तरुण तयार केलेल्या खास सायकलची (Water Cycle) एक झलक दिसते. एखाद्या बाईकच्या रचनेप्रमाणे ही खास पाण्यात चालणारी तीनचाकी सायकल तयार केली आहे. तीनचाकी सायकल चालवण्यासाठी हॅन्डल, तर बसण्यासाठी सायकलप्रमाणे सीट आहे.’ तसेच फक्त चाकांच्या जागी तीन मोठ्या ट्यूब्स लावण्यात आल्या आहेत. कारण – पाण्यात सायकल घेऊन उतरलेली व्यक्ती पाण्यात बुडणार नाही असे यामागील उद्दिष्ट्य आहे ; असे तरुण व्हिडीओत सांगताना दिसतो आहे. तरुणाने कशाप्रकारे पाण्यात चालणारी सायकल तयार केली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

A user has shown a solution to prevent oxidized jewelry from fading
Video : ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा रंग पडलाय फिका? तर ‘हा’ उपाय नक्की करून बघा….
After watching the video you will think 100 times before eating the fruit cake
फ्रूट केक आवडीने खाताय का? फॅक्टरीमधील Video पाहून केक खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल…
fine charged to pune municipal corporation, water resources department of maharashtra, 354 crore fine charged to pune municipal corporation
पुणे महापालिकेला दणका : पुणेकरांचे ३५४ कोटी रुपये जाणार ‘पाण्यात’
kitchen tips in marathi hang water fill plastic bag on door keep away flies lifestyle hacks kitchen jugaad video
Kitchen Jugaad: झोपण्याआधी दरवाजावर पाण्याची पिशवी नक्की लावा; ‘ती’ समस्या घरात येणं दूर, दारातूनच पळून जाईल

हेही वाचा… मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा अनोखा जुगाड; समोर बसलेल्या महिलांनी स्वत:हून दिली बसायला जागा, VIDEO एकदा पाहाच

व्हिडीओ नक्की बघा :

पाण्यात चालणारी सायकल :

अनोखी सायकल पाण्यात चालवून दाखवणाऱ्या तरुणाचे नाव ‘वीरेंद्र सिंग’ असे आहे. तरुण सुरुवातीला वॉटर सायकल कशाप्रकारे तयार करण्यात आली हे व्हिडीओत सांगतो. त्यानंतर सायकलवर बसतो आणि तिला तलावात घेऊन उतरतो. तरुण किनाऱ्यापासून वॉटर सायकल चालवत तलावाच्या अगदी मधोमध जातो. तलावाच्या पाण्यात तरुण सायकलच्या मदतीने आनंद लुटताना दिसतो. पाण्यात चालणारी सायकल तयार करणाऱ्या तरुणांची प्रशंसा करावी तेवढी कमीच. तुम्ही पाण्यात विविध बोटी तरंगताना पहिल्या असतील, पण तरुणाने तयार केलेली ही वॉटर सायकल तुम्ही आजवर कधी पाहिली नसेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @its_mr_virender या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “पाण्यात चालणारी सायकल तयार केली”, असे या व्हिडीओला कॅप्शनदेखील दिले आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण, ‘आतापर्यंत वॉटर सायकल (water cycle) विज्ञानाच्या पुस्तकात वाचलं होत आज प्रत्येक्षात बघितलंसुद्धा’, ‘स्पीड बोटच्या काळात भावाने सायकल बोट तयार केली’ असे म्हणताना दिसत आहेत. तसेच अनेक जण वॉटर सायकलच्या रचनेचं आणि तरुणांच्या कल्पनेचं कमेंटमध्ये कौतुक करताना दिसून येत आहेत

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A young man built a bicycle that runs on water asp

First published on: 03-10-2023 at 14:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×