Viral Video : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही.त्यामुळे वजनवाढीसारख्या समस्या निर्माण होतात. वजन वाढले की अनेकजण जीम लावतात आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. तरुणाईमध्ये जीमचे क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक तरुण मुले चांगली बॉडी आणि सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवण्यासाठी जीममध्ये जातात पण आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाविषयी सांगणार आहोत ज्याने जीमला न जाता सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवले आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. या तरुणाची ही अनोखी मेहनत पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (a young man got six pack abs without gym watch is home made gym video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण जिममध्ये करतात ते सर्व वर्कआउट करत आहेत पण कोणत्याही जिमच्या साहित्याचा वापर न करता. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुण बादली आणि विटांच्या मदतीने वर्कआउट करत आहे. विशेष म्हणजे या तरुणाने सीक्स पॅक अ‍ॅब्स सुद्धा बनवले आहे. त्याचा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. अनेकांना त्याच्या मेहनतीचं कौतुक वाटेल.सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : VIDEO: इलेक्ट्रिक स्कूटरनी भरलेल्या ट्रकला भीषण आग; सर्व वाहने जळून खाक, घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल

कोण आहे हा तरुण?

या तरुणाचे नाव जावेद असून त्याला फिटनेस खूप आवडते. तो देसी पद्धतीने वर्कआउट करतो. javed_fitness786 या नावाने त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. तो त्याच्या अकाउंटवर वेगवेगळ्या वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करतो. इन्स्टाग्रामवर १७० हजार लोक त्याला फॉलो करतात. हा तरुण अनेकांना प्रेरित करू शकतो.

पाहा हा व्हिडीओ

हेही वाचा : “४०० पार फक्त ब्रायन लाराच करू शकतो”, भाजपप्रणीत एनडीएच्या निकालाची नेटिझन्सनी उडवली खिल्ली; भन्नाट मीम्स केले व्हायरल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावाने घरीच जीम बनवली” तर एका युजरने लिहिलेय, “तुमच्याजवळ जे आहेत त्यानुसार चांगलं करा” आणखी एका युजरने लिहिलेय, “माणसामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे, तो काहीही करू शकतो.” या व्हिडीओवर लोकांनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.