Viral Video: पांडा हा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा प्राणी प्रामुख्याने चीनमध्ये आढळतो. बांबूच्या जंगलामध्ये पांडा राहतो. तो वजनदार असून झाडावर चढण्यात पारंगत आहे. पांडा सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे. पांडा शांत व झोपाळू या गुणांनी ओळखला जातो, म्हणून या प्राण्यावर अनेक मीम्स व व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एका प्राणी संग्रहालयात पांडा हा प्राणी झोपलेला असतो, तेव्हा एक तरुण उडी मारून आतमध्ये जातो आणि ही चूक त्याला अगदीच महागात पडते.

प्राणी संग्रहालयात प्राण्यांना विशिष्ट सुरक्षा आणि त्यांची राहण्याची चोख व्यवस्था केली जाते, जेणेकरून प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना ते नुकसान पोहचवणार नाहीत. तसेच पर्यटकांनाही वारंवार सांगितले जाते की, योग्य ते अंतर ठेवून प्राण्यांना पाहावे आणि त्यांच्या परिसरात जाण्याचा प्रयत्न करू नये. हे सांगूनसुद्धा काही जण प्राण्यांच्या जवळ जातात आणि स्वतःवर संकट ओढवून घेतात. तर या व्हायरल व्हिडीओतसुद्धा असंच पहायला मिळालं आहे. तरुण पांडा प्राण्याला जवळून पाहण्यासाठी त्याच्या पिंजऱ्यात उडी मारतो आणि पांडा याला जाग येताच तो तरुणाचा पाय पकडतो. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा… ‘भूपेंद्र जोगी’ नाव सांगत ग्राहकाने केला मेसेज! झोमॅटो कंपनीनेही दिले मीमसह उत्तर…

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओ प्राणी संग्रहालयाचा आहे. पांडा हा प्राणी झोपलेला असतो. पांडा या प्राण्याला जवळून पाहण्यासाठी एक तरुण उडी मारून आतमध्ये जातो आणि त्याला वाकून बघत असतो. तितक्यात पांडा प्राणी जागा होतो आणि पटकन येऊन तरुणाचा पाय पकडतो. बराचवेळ पांडा तरुणाच्या अंगावर झोपताना आणि त्याचा पाय पकडून ठेवताना दिसतो. तर आपली सुटका व्हावी यासाठी तरुण अनेक प्रयत्न करतो, पण पांडा या प्राण्याने त्याचा पाय अगदीच घट्ट पकडून ठेवलेला असतो. असे खूप वेळ चालू असते आणि शेवटी तरुण आपली सुटका करून तिथून पळ काढतो आणि व्हिडीओचा शेवट होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) @cctvidiots अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओतील पांडा १२ वर्षांचा आहे, ज्याचे वजन १२० किलोग्रॅम आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच पांडा प्राणी तरुणाला कोणतेही नुकसान पोहचवत नाही, फक्त तरुणाचा पाय धरून त्याच्या अंगावर झोपताना दिसतो आणि सुदैवाने तरुणाची त्याच्या तावडीतून सुटकाही होते; हे तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल.