गाव हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेक जण गाव सोडून नोकरी आणि शिक्षणासाठी शहरात जातात पण गावाकडची आठवण त्यांना कायम येते. सध्या गावावरील प्रेम दाखवणारे एक गाणं सध्या चांगलेच चर्चेत आहे. “काय सांगू राणी मला गाव सुटना” हे लोकप्रिय गाणं तुम्ही ऐकलंच असेल. सध्या या गाण्याची एका वेगळ्याच कारणाने जोरदार चर्चा सुरू आहे. एका तरुणाने या गाण्याचा अप्रतिम रॅप लिहिलाय. सध्या या रॅपचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल जो “काय सांगू राणी मला गाव सुटना” या लोकप्रिय गाण्याचं रॅप व्हर्जन म्हणताना दिसतोय. हे रॅप व्हर्जन पाहून कोणीही थक्क होईल. खूप सुंदररित्या तो रॅप सादर करतो. तुम्हाला हा रॅप पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटेल. हा तरुण गावातील वेगवेगळ्या ठिकाणी हा रॅप म्हणताना दिसतो. हा रॅप पाहून तुम्हीही भारावून जाल.

हेही वाचा : शेतकऱ्याचा नाद नाही! वावरात आलेल्या बिबट्यासोबत घेतली सेल्फी; VIDEO व्हिडीओ पाहून लोकंही अवाक्

पाहा व्हिडीओ

कोण आहे हा तरुण?

रॅप सादर करणारा हा तरुण एक उत्तम सिंगर आणि लोकप्रिय रॅपर आहे. त्याला सर्व जण रॅप बॉस म्हणून ओळखतात. रॅप बॉस नावाचं त्याचं इन्स्टाग्राम आणि युट्यूब पेज आहे. यावर तो त्याचे नवनवीन गाणी आणि रॅप शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्याचे हजारो चाहते आहेत जे त्याला फॉलो करतात.

rapboss805 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मला गावा सुटना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “कडकच भावा” तर एका युजरने लिहिलेय, “शहरात डांबरीमूळ मला ठेचं लागचना” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा तुझ्या रॅपचा नाद नाही करायचा” एक युजर लिहितो, “काय भारी रॅप तयार करता राव. तुम्ही एकदा गुलाबी साडी या गाण्यावर रॅप सॉन्ग तयार करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहे. अनेकांना हा रॅप खूप आवडला आहे.