Video : महाराष्ट्राला अद्भुतरम्य निसर्ग लाभलेला आहे. अशातच येथीस रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. दर दिवशी हजारो पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणाला भेट देतात. देवकुंड धबधब्यावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल होत असतात. सध्या येथील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक पर्यटक वाहत्या झऱ्यात अडकलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ देवकुंड धबधब्यावरील आहे. येथील वाहत्या झऱ्यात एक कुत्रा अडकलेला दिसत आहे आणि मदतीसाठी तो आवाज देत आहे. तितक्यात एक पर्यटक येतो आणि दोरीच्या मदतीने कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो; पण जेव्हा तो कुत्र्याला उचलण्यासाठी त्याच्या अंगाला हात लावतो तेव्हा कुत्रा त्याच्या अंगावर जोरजोराने भुंकतो.
कुत्रा अंगावर येईल या भीतीने पर्यटक थोडा वेळ थांबतो; पण पुन्हा कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी कुत्र्याचा पाय पकडून त्याला झऱ्यातून बाहेर काढतो.

हेही वाचा : शेवटी बाप हा बापच असतो! मुलाला वाचवण्यासाठी त्यानं जीवाचं रान केलं, मात्र… अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. पण, नेटकऱ्यांनी पर्यटकाच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. puneri_bhatkanti या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिलेय, “मदत करणाऱ्या अशा लोकांची खरंच या समाजाला गरज आहे” तर एका युजरने लिहिलेय, “देवमाणूस” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच तू खूप छान काम केलंस. देवसुद्धा तुला अडचणीच्या वेळी मदत करील.”