Viral Video: बाबा आणि लेकीचे नाते जगातील सगळ्यात सुंदर नात्यांपैकी एक आहे. जन्मलेल्या लेकीला पहिल्यांदा हातात घेतल्यावर प्रत्येक बाबाच्या डोळ्यांत नकळत पाणी येतं आणि तिथूनच बाबा व लेकीच्या अनोख्या प्रवासाची सुरुवात होते. शाळा, कॉलेज, जॉब ते आयुष्यातील जोडीदार निवडेपर्यंत बाबा हा लेकीच्या प्रत्येक सुख-दुःखात साथ देताना दिसतो. आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इथे बाबा-लेकीच्या नात्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. काय आहे या व्हिडीओत खास चला पाहू.

युजर अनन्या आणि तिचे बाबा लाँग ड्राईव्हला गेलेले असतात. बाबा गाडी चालवत असतात. या क्षणाला आणखीन खास करण्यासाठी अनन्याला एक युक्ती सुचते. गाडीमध्ये ती मोबाईल शूट करण्यास लावून ठेवते आणि ‘अभी ना जाओ छोड कर’ हे ९० च्या दशकातील प्रसिद्ध गाणं गाण्यास सुरुवात करते. बाबासुद्धा तिच्या गाण्याला साथ देत, त्यांच्या सुरेल आवाजात गाणं गाण्यास सुरुवात करतात. बाबा आणि लेकीची हिंदी गाण्याची मैफील व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा पाहा.

हेही वाचा…VIDEO: मद्यपान करणे पडले महागात; ३० फूट लांब नाल्यात अडकली व्यक्ती, मदतीसाठी पोलिसांची तारेवरची कसरत

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, गाडीत बसून बाबा आणि लेक दोघेही कोणत्याही वाद्याशिवाय ‘अभी ना जाओ छोडकर’चं सुरेल सादरीकरण करताना दिसत आहेत. हे गाणं सादर करताना बाबा आणि लेक या दोघांच्याही चेहऱ्यावरील प्रसन्नता, त्यांचं ताल-सुराचं भान राखत गाणं सादर करण्याचं अप्रतिम कौशल्य यामुळे तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून बाबा-लेकीच्या या जोडीचं कमेंटमध्ये भरभरून कौतुक करताना दिसून आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’ हे सदाबहार गाणं १९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दोनो’ या चित्रपटातील आहे. हे गाणं अभिनेत्री साधना आणि देवानंद यांच्यावर चित्रित झालेलं आहे. चित्रपटात देव आनंदची दुहेरी भूमिका; तर जोडीला साधना व नंदा आणि जयदेव यांचं संगीत यांमुळे आणखी आकर्षण वाढलं. हम दोनो या चित्रपटाचे दिग्दर्शक अमरजीत आहेत. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @ananyasharmamusic या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो सध्या सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहे.