Kid Accident Video Viral: आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होतो. अशा वेळेस जर आपल्याच डोळ्यासमोर आपलं लेकरू अचानक गाडीसमोर आलं, तर त्या आईचं काय होईल याचा विचार करा. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक ३ वर्षाच बाळ आईसमोरच गाडीखाली येतं.

मुलाच्या अपघाताचा व्हायरल व्हिडीओ (Shocking Video of Boy Accident)

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा धक्कादायक व्हिडीओ पाहून सगळ्यांच्याच काळजात धडकी भरली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, आई आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन कारमध्ये बसणार असते पण तिच्या हातात एक बॅग असते त्यामुळे लहान मुलाचा हात तिने पकडला नसतो. आई कारचा दरवाजा उघडणार इतक्यात ते तिचा लहान मुलगा धावत रस्त्यावर जातो. आईदेखील त्याच्यामागे लगेच जाते. पण काही सेकंदातच रस्त्यावर एक वेगवान कार येते आणि ती कार मुलाच्या अंगावरून जाते.

आपल्या बाळाला वाचवण्याचा आई आतोनात प्रयत्न करते पण आपल्याच डोळ्यांसमोर मुलाचा असा अपघात पाहून ती रस्त्यावरच कोसळते. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @reshma.saifi.186 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल एक लाख साठ हजार व्ह्यूज आले आहेत. तसंच “एका आईसमोर तिच्या ३ वर्षाच्या बाळाचा झाला खतरनाक अपघात, रस्त्यावरून चालताना आपल्या मुलांची जास्त काळजी घ्या प्लीज” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ही आईची चूक आहे, बिचारं बाळ”, तर दुसऱ्याने “गाडीची चूक नाही आहे सगळं अचानक घडलं” अशी कमेंट केली.