स्वत:च्या लग्नाला उशिरा पोहोचणे एका नवरदेवाला चांगलेच महाग पडले आहे. लग्नाच्या मांडवात नवरदेव उशिरा पोहोचल्यामुळे चिडलेल्या वधूने लग्न करण्यास नकार दिला. उत्तर प्रदेशच्या नानगालजाट गावात मागच्या आठवडयात ही घटना घडली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. वरात उशिराने पोहोचल्यामुळे चिडलेल्या वधून नवरदेवासोबत विवाहाच्या बोहल्यावर चढण्यास नकार दिला. त्याऐवजी तिने गावातील दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलीने ज्या मुलाबरोबर लग्न मोडले त्याच्याबरोबर तिचे सामूहिक विवाहसोहळयात लग्न झाले होते. ते चार डिसेंबरला पुन्हा विधिवत लग्न करणार होते. नवरदेव धामपूर येथे राहतो. त्याने दुपारी दोनवाजेपर्यंत वरात घेऊन वधुच्या गावी पोहोचणे अपेक्षित होते. पण वरपक्ष रात्री उशिराने पोहोचला. हुंडयावरुन आधीच दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरु होते. त्यामुळे वधूपक्षाच्या मनामध्ये आधीपासूनच राग धुमसत होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After baraat arrives late bride finds herself a new groom uttar pradesh dmp
First published on: 09-12-2019 at 16:45 IST