आजकाल प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद करुन ठेवण्याची सवय लागली आहे. त्यामुळे अनेकजण मित्रांबरोबर पार्टी करतानाचे असो वा बाहेर फिरायला गेल्याचे असो, प्रत्येक ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अशातच जर लग्नाचा विषय असेल तर लोकांना फोटो काढण्याची किती हौस असते, हे सांगण्याची गरज नाही. शिवाय आजकाल प्री-वेडिंग फोटोशूट, बेबी बंप फोटोशूट, अशा अनेक प्रकारचं फोटोशूट केलं जातं, जे तुम्हीदेखील अनेकवेळा पाहिलं आहे. पण सध्या सोशल मीडियावर अशा फोटोशूटची चर्चा सुरु आहे, ज्याची तुम्ही कल्पनादेखील करु शकत नाही.

हो कारण एका महिलेने चक्क आपल्या पतीपासून विभक्त झाल्याचे म्हणजेच घटस्फोट घेतल्याचे फोटोशूट केलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिने हे फोटोशूट खूप आनंदाने केलं असून ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या अनोख्या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून अनेकजण हे अनोखं फोटोशूट पाहून थक्क झाले आहेत.

हेही पाहा- गर्लफ्रेंड मिळाली आणि क्षणात फेमसही झाला; तरुणाच्या अनोख्या प्रपोजची सोशल मीडियावर होतेय जोरदार चर्चा

व्हायरल होत असलेल्या फोटोमधील महिलेने आपला नवऱ्यापासून वेगळा होण्याचा निर्णय योग्य असल्याचा संदेश देत आहे आणि त्यामुळे ती खूप खूश आहे. फोटोमधील महिलेच्या हातात ‘DIVORCED’ अशी अक्षरे धरली असून याचवेळी ती तिच्या लग्नातील एक फोटो फाडताना दिसत आहे. शिवाय घटस्फोटानंतर इतक्या आनंदाने फोटोशूट करणाऱ्या महिलेला पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत.

हेही वाचा- क्षणात होत्याच नव्हत झालं! रील बनवताना केलेलं भलतं धाडस बेतलं जीवावर, तिघांनी एकत्र नदीत उडी मारली अन्…,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shalu2626 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेले फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर या फोटोमधील यमहिलेचे नाव शालिनी असल्याचे सांगण्यात येत आहे. फोटोंमध्ये, शालिनीने अनोख्या पद्धतीने घटस्फोट फोटोशूट केलं आहे. शिवाय या फोटोंच्या माध्यमातून तिने आपला एकटेपणा दाखवला आहे. फोटोमध्ये ती एका स्लिटसह लाल ड्रेसमध्ये दिसत आहे. यावेळी ती हातातील ‘DIVORCED’ अक्षरांसह ती तिच्या लग्नातील फोटो पायांनी तुडवताना दिसत आहे. तसेच तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये, प्रत्येक गोष्टींचा शेवट हा नवीन सुरुवातीकडे घेऊन जातो, असं लिहिलं आहे. सध्या हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.