ऑनलाइन शॉपिंगमुळे प्रत्येकाचे जीवन अगदी आरामदायी झाले आहे. पूर्वी प्रत्येकाला काही वस्तू खरेदी करायची असेल तर दुकानात जावे लागायचे आणि तिथे ती वस्तू मिळाली नाही तर चार-पाच दुकानं फिरावं लागायचं. पण, ऑनलाइन सुविधा आल्याने लोक घरात बसून त्यांना आवडणाऱ्या किंवा पाहिजे असलेल्या वस्तू ऑर्डर करू शकतात. पण, या सुविधेमुळे अनेकदा मोठ्या आर्थिक समस्याही निर्माण होतात. त्यामुळे तुम्हीही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर खालील व्हिडीओ पाहायलाच हवा.
व्हायरल व्हिडीओत नेमकं काय आहे?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती डिलिव्हरी बॉयकडून २७ हजार रुपये परत मागताना दिसत आहे. डिलिव्हरी बॉय त्या व्यक्तीला सांगतो, ‘तुम्ही कंपनीशी संपर्क साधा आणि पैसे परत घ्या, माझ्याशी वाद घालू नका आणि कॅमेरा बंद करा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने Realme 11 pro+ हा मोबाइल ऑनलाइन ऑर्डर केला होता, पण त्याला बॉक्समध्ये मोबाइलऐवजी साबणाची एक वडी डिलिव्हर झाली. या मोबाइलसाठी त्याने २७ हजार रुपये ऑनलाइन पेड केले होते, त्यामुळे तो त्या डिलिव्हरी बॉयला अडवून पैसे परत करण्याची मागणी करताना दिसतोय. त्यामुळे तुम्हीही मोबाइल, लॅपटॉप अशा महाग गोष्टी ऑनलाइन ऑर्डर करण्यापूर्वी जरा १० वेळा विचार करा.
Video: ट्रॅक्टर आहे की रेल्वेची मालगाडी! रस्त्यावरचे ‘हे’ दृश्य पाहताच लोकांनी धरले डोके!
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, साबण खूप महाग झाला आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, म्हणूनच COD हा एक चांगला पर्याय आहे. तिसर्या युजरने लिहिले की- हा काय विनोद आहे.