Dahihandi viral video: नुकताच दहीहंडीचा उत्सव पार पडला याच पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये चक्क ८७ वर्षीय एका आजोबांनी चक्क दहीहंडी फोडली आहे. एखाद्या गोष्टीची आवड असेल तर वय आडवं येत नाही असं म्हणतात आणि तेच दाखवून दिलंय पालघर माहीम(तांबळाई) येथील ८७ वर्षीय भालचंद्र चुरी या आजोबांनी.. या आजोबांनी तरुणांच्या खांद्यावर चढून दहीहंडी फोडली आहे. विशेष म्हणजे हे आजोबा आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांच्या गावचे आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आजोबांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नसून उत्साह दिसत आहे. यावेळी त्यांनी तरुणांच्या खांद्यावर चढून दहीहंडी फोडून सर्वच तरुणांना आपण अजूनही तरुण असल्याचे दाखवून दिले.वाढत्या वयासोबत माणसाचा उत्साह हळूहळू कमी होत जातो. कारण त्याचं शरीर थकतं, त्याला विविध प्रकारचे आजार होतात. त्याची मानसिक क्षमता देखील हळूहळू कमी होत जाते. अन् त्यामुळेच वृद्ध मंडळींमध्ये निरूत्साहाचं प्रमाण जरा जास्तच दिसतं. पण या आजीबाई मात्र मानवी स्वभावाला अपवाद ठरताना दिसत आहेत किंबहूना तरुणांच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या जल्लोषात त्या दहीहंडी सण साजरा करतायेत.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये, अजूनही ताकद, अजूनही जोश, वय फक्त आकडा, मनात तरुणाईचा ओघ. ८७ व्या वर्षीही दिली धडाडीची साथ, दहीहंडी फोडून दाखवली प्रेरणेची झलक. घामाचा मान, जिद्दीचा गंध, तुमच्या पावलांनी उजळली ही दहीहंडीची दंतकथा भव्य. संसाराला शिकवले – वय नाही अडथळा, जिद्द असेल तर प्रत्येक दिवस नवा सोहळा…असं कॅप्शन दिलं आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आजोबांचं कौतुक करत आहेत. कारण ज्या वयात लोकांना धड उभं राहाता येत नाही. त्याच वयात या आजोबा हंडी फोडतायेत. असो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या