आर्टिफिशल इंटेलिजन्सने (AI) अनेकांचे अख्खे आयुष्यच बदलून टाकले आहे, असे म्हणायला हरकत नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल निर्मितीच्या जगातील काही अशक्य गोष्टी शक्यप्राय होताना दिसत आहेत. यात सोशल मीडियावर AI च्या मदतीने काढलेल्या काही हटके फोटोंची यादीच व्हायरल होत आहे. ज्यात आता जगातील काही प्रसिद्ध अब्जाधीशांचे ‘स्लमडॉग बिलियनेयर्स’ च्या रूपातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, मुकेश अंबानी, मार्क झुकेरबर्ग यांच्यासह काही जगातील श्रीमंत व्यक्ती गरीब असत्या तर कशा दिसल्या असत्या हे या फोटोतून दाखवण्यात आले आहे. अगदी खरे वाटणारे हे फोटो AI तंत्राचा वापर करून बनवण्यात आले आहेत.

फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, मुकेश अंबानी, मार्क झुकेरबर्ग, वॉरन बफेट, जेफ बेझोस आणि एलॉन मस्क यांसारख्या जगातील श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. या फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता, डोनाल्ड ट्रम्पपासून ते मुकेश अंबानींपर्यंत प्रत्येक जण गरिबांच्या पोशाखात दिसत असून, ते झोपडपट्टीसारख्या वातावरणात सामान्य व्यक्तीसारखे उभे आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला अजिबात वाटणार नाही की, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनवले आहेत, कारण हे फोटो अगदी हुबेहूब खरे असल्याचे भासतात.

अबब! ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा, ज्याची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

डिजिटल क्रिएटर गोकुळ पिल्लई यांनी इन्स्टाग्रामवर जगातील काही श्रीमंत व्यक्तींचे गरीब अवस्थेतील फोटो AI च्या ‘मिडजॉर्नी’ द्वारे शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करताना पिल्लई यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्लमडॉग मिलियनेअर्स. (या लिस्टमध्ये कोणाचा समावेश करायचा राहिला आहे का?). सध्या इन्स्टाग्रामवर हे फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्सकडूनही उलट-सुलट कमेंट्स केल्या जात आहेत. काहींना हे फोटो खूप आवडलेत, तर काही जण खिल्ली उडवताना दिसत आहेत. या पोस्टने सोशल मीडियावर आता अनेकांना आकर्षित केले आहे. आत्तापर्यंत १०००० हून अधिक लाईक्स आणि असंख्य कमेंट्स फोटोखाली येत आहेत. अनेक क्रिएटर्स आपली अप्रतिम क्रिएटिव्हीटी दाखवण्यासाठी एआय टूल्सचा कसा फायदा घेत आहेत याचे हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी ज्यो जॉन मुल्लूर नावाच्या एका इन्स्टाग्राम युजरने राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा आणि एल्विस प्रेस्ली यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे सेल्फी घेतानाचे फोटो पोस्ट केले होते. यासाठी AI सॉफ्टवेअर मिडजर्नी आणि फोटोशॉपचा वापर केला होता. त्या फोटोंनी देखील इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता.